अन्न दाना पेक्षा रक्त दान श्रेष्ठ:श्रीनिवास बोज्जा लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावूनच्या वतीने जागतिक सेवा सप्ताह निमित्त रक्तदान शिबीर!

अहमदनगर (प्रतिनिधी)-लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून च्या वतीने जागतिक सेवा सप्ताह निमित्त रक्तदान शिबीर सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले. या वेळी सिव्हिल हॉस्पिटल चे सिविल सर्जन डॉक्टर संजय घोगरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मनोज घुगे, डॉक्टर सुमय्या खान, तसेच लायन्स क्लब मिटवून चे संस्थापक श्रीकांत जी मांढरे क्लबचे सचिव प्रसाद मांढरे, कोल्हे मॅडम, श्याम पारेकर, श्री आंधळे श्री गर्जे तसेच फटाका असोसिएशनचे सुनील शेठ गांधी, देविदास ढवळे, मयूर भापकर, उद्योजक विनय गुंदेचा अशोक बोज्जा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले रक्तदान करणे ही काळाची गरज आहे कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला तेव्हाच रक्ताची खरी किंमत लोकांना कळाली यासाठी रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून वेळोवेळी नागरिकांनी स्वयंफुर्तीने रक्तदान करावे. अन्नदानापेक्षा रक्तदान ही श्रेष्ठ दान आहे असे श्री. बोज्जा म्हणाले.
सिव्हिल सर्जन संजय घोगरे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून रक्तदानासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे असे आवाहन केले.
सुरुवातीस क्लबचे संस्थापक श्रीकांत मांढरे यांनी क्लबच्या गेल्या 30 वर्षाची अखंड माहिती दिली व सध्या जागतिक सेवा सप्ताह सुरू असल्याने एक आक्टोंबर ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये सर्वसामाजिक कामे क्लबच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यास नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन
केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत अशोक बोज्जा यांनी केले तर आभार विनय गुंदेचा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लब मिडटावून चे सर्व सभासदांनी सहकार्य केले.