गुन्हेगारी

बेलवंडी पोलीस स्टेशनमधील सह्यायक पोलीस उपनिरीक्षकाने केली आत्महत्या!

श्रीगोंदा (प्रतिनिधी)
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनमधील सह्यायक पोलीस उप निरीक्षक सुनिल धोंडीबा मोरे वय वर्ष 54 यांचा राहत्या घरी लक्ष्मीनगर येथे लोखंडी जिण्याला साडीच्या सह्याने गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. माञ, नातेवाईकांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून यांनी जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात सह्यायक पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनिल धोंडीबा मोरे हे मागील 3 महिन्यांपासून वैद्यकीय कारणासाठी रजेवर होते. माञ, त्यांच्या नातेवाईकांनी माद्यमांशी बोलताना सांगितले की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि मयत मोरे यांच्यात तीन महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाला होता. यांनतर सुनिल मोरे हे रजेवर होते. परंतु, मागील तीन ते चार दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक यांनी त्यांना बोलाऊन घेउन त्यांच्याकडील गुन्हे पोलीस ठाण्यात जमा करून घेतले.
यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली… तेंव्हा पासुन ते मानसीक तणावात असल्याचे जाणवत होते. त्यातच आज दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास दसरा असल्यामुळे घरचे पूजेसाठी फुलं आणि सोनं आनण्यासाठी बाजारात गेल्यानंतर त्यांनी घरातील साडीने लोखंडी जिन्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेऊन, त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मयताचे चुलत भाऊ बाळासाहेब गणपत मोरे यांनी खबर दिली. त्यानूसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करीत आहेत. या प्रकरणी सत्य लवकरच उजेडात येईल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे