श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे भीमाशंकर लांडे यांचा सत्कार आनंदी जीवन जगण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक- सर्वोत्तम क्षीरसागर

अहमदनगर(प्रतिनिधी) – भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे. ते परिवाराचा आधारवड असल्याने त्यांचा सन्मान केला पाहिजे. आयुष्यात चांगल्या-वाईट गोष्टी येतात. त्यांचा शांतपणे विचार करुन त्यावर मात करते. यातून जीवन जगण्याचा मार्ग सापडतो. म्हणजेच आनंदी जीवन जगण्यासाठी स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर यांनी केले.
सावेडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे येथील लिटील फ्लोअर प्रायमरी स्कूलमध्ये ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन शिबीरप्रसंगी भीमाशंकर लांडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, रविंद्र बारस्कर, दगडू पवार, हनुमंत भुतकर, महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, सारिका भुतकर, एन.बी.धुमाळ आदि उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबीरप्रसंगी परिसरातील सुमारे 200 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी भीमाशंकर लांडे यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाला 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी अनिल बोरुडे यांनी 11 हजार तर छबुराव भुतकर यांनी 10 हजार रुपये संघास दिली. यावेळी नाना लांडे, बाबासाहेब वाकळे, भगवान फुलसौंदर, पुष्पा बोरुडे, सारिका भुतकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन श्री.वाघे यांनी केले तर आभार विश्वनाथ जाधव यांनी मानले.