शौर्य दिनानिमित्त, शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा संपन्न

अहमदनगर दि.29 (प्रतिनिधी) :- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे 29 सप्टेंबर 2016 अतिरेक्यांचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी “शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्याअनुषगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता येथील महासैनिक लॉन येथे सहायक संचालक स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई विजय बा वाकचौरे यांचे अध्यक्षतेखाली सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी निवडणूक जितेंद्र पाटील, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, जिल्हा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब धवने, ले. कर्नल यशवंत बहादुगे (निवृत्त), कॅप्टन प्रभाकर गोविंद चौधरी (निवृत्त) तसेच प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्तात्रय सु. शिंदे व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शौर्य दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हयातील शौर्यपदक धारक, युद्ध विधवा, वीरमाता/वीरपिता तसेच माजी सैनिक विधवा, अवलंबित व शासकीय कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. युध्दात शहीद झालेल्या जवानांना प्रथम श्रध्दांजली अर्पण करुन शौर्य पदक धारक माजी सैनिक व त्यांचे कुटुंब तसेच शहीद जवानांच्या वीरपत्नी/वीरमाता/पोरपिता. माजी सैनिक / विधवा सेवारत सैनिक तसेच कोविड योध्दा यांचा सुध्दा सन्मान करण्यात आला.
डॉ. निलेश बागुल यांनी सुत्रसंचालन केले व अंकुश हांडे, वरिष्ठ लिपिक यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.