सामाजिक

शिर्डी येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि शिर्डी येथील साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते३० ऑक्टोबर २०२२ दरम्यान राज्यस्तरिय पर्यावरण संमेलन होणार असल्याची माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व राज्य संघटक पोपट पवार सर यांनी दिली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली व शिर्डी येथील साई संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांच्या सहकार्याने या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पर्यावरण संमेलनात पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन,प्रदूषण निवारण, घनकचरा व प्लास्टिक निर्मूलन, निसर्गाचे रक्षण,वने रक्षण, जंगलातील वणवे रोखणे,वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अशा अनेक विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. पर्यावरण संरक्षण बाबत ठराव घेतला जाणार असून शेतकरी कार्बन क्रेडिट शेतीच्या दृष्टीने या महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच या तीन दिवसीय संमेलन काळात शिर्डी परिसरातील पर्यावरण अभ्यास, सौर प्रकल्प, दूषित पाणी शुद्धीकरण व पुनर्वापर प्रकल्प पाहणी व संस्थेच्या नैसर्गिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची ओळख तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पर्यावरण उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे.या संमेलनात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक पोपट पवार सर मो.९४२१४३९६५१,पर्यावरण सखी मंचच्या राज्य कार्याध्यक्षा छायाताई रजपूत मो.९४२३७९३१४१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे