कर्ज व्याजदरातुन सलग पाच वर्षे फसवणुक,*निवडणुक जवळ आल्याने शेवटच्या दीड वर्षात व्याजदर कमी करुन “मूलामा” देण्याचा केवीलवाणा प्रयत्न*= नारायण राऊत
कर्जाचा व्याजदर कमी केला हे "तुणतुणे" बंद करा!

जामखेड (प्रतिनिधी)
*कर्जाचा व्याजदर कमी केला हे “तुणतुणे” बंद करा!
*सुरक्षारक्षक घोटाळा,घड्याळ खरेदी घोटाळा,शताब्दी* *घोटाळा,नेवासा व पाथर्डी शाखा दुरुस्ती घोटाळा,विमानाने केलेला मिटींगसाठी प्रवास व कोरोना काळातील लाखोंचे भत्ते,आसाम मध्ये चहाचा मळा घेता आला असता एवढा प्रचंड चहापान घोटाळा,इतर रिपेअर,इलेक्ट्रीक रिपेअर व इतर खर्च या नावाखाली पचवलेला मलिदा,कनेक्टीव्हीटी व टेक्नीकल सपोर्ट चार्जेस माध्यमातुन केलेली वरकमाई,रंगरगोटी ,राहुरी शाखा रक्कम बनावट चोरी प्रकरण ,अनेक प्रकारच्या खरेद्या या व इतर शेकडो कृत्यांतुन बदनाम झालेल्या* गुरुमाऊलीत *”आर्थिक”* कारणाने ऊभे दोन गट पडले व सांगण्यासाठी काहीच राहीले नाही म्हणुन *”आम्ही कर्ज व्याजदर कमी केला”,फक्त चेहराच नको तर कारभार पहा”,बँक काल व आज” अशा खोट्या बाबी सांगुन सभासदांची दिशाभुल ओरीजिनल व डुप्लिकेट यांनी चालवली आहे* अशी प्रतिक्रिया सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी दिली.
कर्जाचा व्याजदर हा 8.70% केला हे तूणतूणे सातत्याने वाजवत आहे पण,*8.70% व्याज कधीपासुन केला हे अभ्यासणे देखील महत्वाचे आहे.*
कर्जाचा व्याजदर हा मुदत ठेवी,रिकरिंग ठेवी व सेव्हींग्ज ठेवी यांचा व्याजदर किती आहे,यावरुन देखील कमी जादा होतो,हेही पाहणे महत्वाचे!
========================
*सन 14/15*=मुदत ठेव व्याजदर 10.50%, रिकरिंग व्याज 7.50% ,सेव्हिंग्ज व्याज 5% व कर्ज व्याजदर 11%
========================
*सन 15/16*=मुदत ठेव व्याज 10.50% नंतर10% व शेवटचे दोन महीने 9.75%, रिकरिंग 7% सेव्हींग्ज 4.5% व कर्ज व्याजदर 11%
========================
*सन 16/17*= मुदत ठेव व्याजदर 8.75% व कर्जव्याजदर=11% व जामीन नं.2=13%, रिकरिंग6.75% ,सेव्हींग्ज 4%
========================
*सन17/18*=मुदत ठेव व्याजदर 8.75%, व कर्जव्याजदर 10.75% रिकरिंग 6.50%,सेव्हिंग्ज 3.75%
========================
*सन18/19*=मुदत ठेव व्याजदर 8% व कर्ज व्याजदर 10.75% ,रिकरिंग 6.50%, सेव्हींग्ज3.50%
========================
*सन19/20*=मुदत ठेव व्याजदर सहा महिने 7.50% व नंतर सहा महिने 7%, कर्जव्याज=10.50%, रिकरिंग 6.75%, सेव्हींग्ज 3.50%
========================
*सन20/21*=मुदत ठेव व्याजदर सूरुवातीला 7% व नंतर काही काळ 6.50% ,कर्जव्याज=10.50% व आर्थिक वर्ष संपताना फक्त 16 दिवस म्हणजे दि.16/03/2021 पासुन 9.50%, रिकरिंग 6.50% ,सेव्हिंग्ज 3%
========================
*सन 21/22*= मुदत ठेव व्याजदर 6.50% व कर्ज व्याजदर 9.50% व नंतर काही काळ 9.25%, रिकरिंग 6.25% व सेव्हींग्ज 3%
========================
*कर्जाचा व्याजदर दि.1एप्रील 2022 पासुन 8.70% गुरुमाऊली मंडळाने केला* *निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन*!
========================
सन 20/21 मध्ये आपल्या बँकेच्या ठेवी या 1134 कोटी होत्या,त्यात बाहेरील नागरिक व शिक्षकांनी ठेवलेल्या *मुदत ठेव पावत्या=726 कोटी,शिक्षक कायम ठेव =185 कोटी,सेव्हींग्ज ठेवी 124 कोटी,रिकरींग ठेवी 15 कोटी,दामदुप्पट,दीडपट,अमरपेन्शन ठेवी 99 कोटी आहेत!*
व शिक्षकांना दिलेले कर्ज हे *863 कोटी* आहेत!
संपुर्ण भारतात रिझर्व बँकेच्या धोरणानुसार राष्ट्रीयीकृत बँका,सहकारी बँका,नोकरदारांच्या बँका व पतपेढ्या यांचेकडील मुदत ठेवीं,रिकरिंग,सेव्हींज ठेवींचे व्याजदर सातत्याने खुप घसरले!परिणामी आपल्या शिक्षक बँकेकडे असलेल्या सर्व ठेवींचे व्याजदर ही घसरले!
आपली बँक सन 2013 पासुन स्वभांडवली झाली,कोणत्याही बँकेकडुन कॅशक्रेडीट न घेता आपली बँक,मुदत ठेवी,रिकरिंग ठेवी,सेव्हींग्ज व इतर ठेवी व स्वभांडवलातुन कर्ज वितरण करायला लागली! *आपल्या बँकेची 100% वसुली”* या पुर्वजांनी केलेल्या पुण्याईच्या जोरावर आपल्या बँकेच्या मुदत ठेवी सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या व कर्ज कमी व्याजदरात शिक्षकांना देणे शक्य झाले! *कोणतेही संचालक ठेवी वाढवण्यासाठी दारोदार हिंडले नाही*
सत्ता येताच कर्जव्याजदर कमी करु अशी गर्जना करणार्या गूरुमाऊलीने ,बँक स्वभांडवली असतांना,मुदत ठेवी व इतर ठेवींचे व्याजदर भरपुर कमी झालेले असतांनाही कर्जाचा व्याजदर बँक निवडणुक जवळ आल्यावर शेवटी शेवटी वर्षभरात व आता 1 एप्रिल 2022 पासुन 8.70% केला, हे सर्व सभासद जाणतात, त्यामुळे तुमच्या *व्याज कमी केले,व्याज कमी केले*,*बस नाम ही काफी है,बँक कालची व बँक आजची* याला सभासद भुलणार नाही! हे नक्की!
दोन्ही गूरुमाऊलींना सभासद सत्तेबाहेर ठेवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशी प्रतिक्रिया सदिच्छा मंडळाचेजिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी दिली.