चांगल्या कामाचे फळ हे नेहमीच चांगले असते – श्रीनिवास बोज्जा बोज्जा, जाधव, भापकर यांचा फटाका असोसिएशन च्या वतीने सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने फटाका असो. चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांची लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावुन च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच असो चे आदेश जाधव यांची अहमदनगर शहर केमिस्ट असो च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल तसेच मयूर भापकर यांची माळीवाडा तरुण मंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल असो. च जेष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे व सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या वेळी बोलतांना असोचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले फटाका व्यापारी संस्था ही व्यापारी संस्था असूनही सर्व सभासद हे एक परिवारा सारखे राहतात त्यामुळे हा सत्कार आपल्या कुटूंबातील सत्कार असल्याचे मी मानतो.चांगल्या कामाचे फळ हे नेहमीच चांगले असते म्हणून चांगले काम करत रहा तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होते.
या वेळी आदेश जाधव व मयूर भापकर यांनी सत्काराला उत्तर देतांना सर्व सभासदांचे व असो. चे मनापासून आभार मानले.
सदरहू कार्यक्रम चे सूत्रसंचालन उमेश क्षीरसागर यांनी केले तर स्वागत सोमा रोकडे यांनी केले तर आभार अरविंद साठे यांनी मानले या वेळी सचिव संतोष बोरा, गजेंद्र राशीनकर, सुनील गांधी, गणेश परभने, साहेबराव गारकर, संजय सुराणा, विकास पटवेकर, विजय मुनोत, सुनील पोपटानी, संतोष वल्ली, भगत, राजू छल्लानी आदी उपस्थित होते.