शिक्षक दिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत प्राथ. शिक्षक दिपक कारंजकर यांनी केला लग्नाचा वाढदिवस साजरा!

चांदे खुर्द ( अमोल गंगावणे वार्ताहर) ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.या शिक्षक दिनानिमित्त विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबविले जातात. कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोख्या पद्धतीने शिक्षकदिन साजरा करण्यात आला.वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवशी अवास्तव खर्च टाळत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे
शिक्षक दिपक प्रभाकर कारंजकर सर यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य ( पाटी व अंकलिपी) वाटप करून त्यांनी वाढदिवस साजरा केला,खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षक दिन साजरा करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला.त्यांच्या सौभाग्यवती स्वाती बांदल/कारंजकर या देखील जगदंबा विद्यालय राशिन या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी अमोल जाधव साहेब यांची प्रेरणा व गटशिक्षणाधिकारी शिवगुंडे मॅडम व विस्तारअधिकारी लगड साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.