लायन्स मिडटावूनच्या वतीने मुकबधीर विदयालयात शिक्षक दिन संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त लायन्स मिडटावूनच्या वतीने तपोवन रोड, भिस्तबाग जवळील मुकबधीर विदयालयात 11 शिक्षकांचा सत्कार करून व मुलांना खाऊ व फळे वाटप करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी मूकबधिर विद्यार्थ्यांनी मुक अभिनया द्वारे कला सादर करून भारत देशाच्या अमृत महोत्सव निमित्त देशभक्तीवर नृत्य सादर केले.
प्रारंभी लायन्स मिडटावूनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी स्वागत करून लायन्स मिडटावून विविध क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून आज येथील शिक्षकांचा गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले. मूकबधिर वसतिगृहाचे अध्यक्ष श्री. धावले यांनी संस्थे विषयी माहिती देऊन लायन्स मिडटावून या शाळेत गरजू वस्तूंचे विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी सहाय्य करीत असल्याचे प्रतिपादन केले. या शाळेतील शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने येथोचित सत्कार केल्याबद्दल धन्यवाद मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थापक श्रीकांत जी मांढरे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक करत या मूकबधिर विद्यार्थ्यांना शिकवणे एक अवघड कला असून या विद्यार्थ्याकडून सर्व सोयीस्कर रित्या शिक्षण देत असल्याबद्दल विशेष धन्यवाद मानले वाचा उपचार तज्ञ तसेच विशेष शिक्षिका यांच्याकडून विशेष ज्ञानार्जन होत असून विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयार होत असल्याचे प्रतिपादन केले.
शाळेचे मुख्याध्यापक डी के जगधने, विशेष शिक्षक सौ मांडवे एस एस., एस आर ढाकणे, अरबी भांड, श्रीमती एस ए जेजुरकर वाचा उपचार तज्ञ ए एस शेख, विशेष शिक्षिका श्रीमती केके पाडवे तसेच डॉक्टर कल्पना ठुबे, प्राध्यापक स्वाती जाधव, प्राध्यापक संदीप सांगळे या शिक्षकांचाही सत्कार लाइन्स मिडटावूनच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास सचिव प्रशांत मांढरे, उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुनंदा तांबे, डॉक्टर कल्पना ठुबे, माजी अध्यक्ष संपूर्ण सावंत व स्वाती जाधव उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार प्रसाद मांढरे यांनी मानले.