नगर शहरातून भविष्यात ऑलम्पिकसाठीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील : किरण काळे शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील विजयी क्रीडापटूंचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) : कुस्ती, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, तायक्वांदो अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये नगर शहर व जिल्ह्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू राज्याला आणि देशाला दिले आहेत. यामध्ये भारतीय संघातील क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, गोलंदाज झहीर खान, भारतीय कबड्डी संघाचा भूतपूर्व कप्तान पंकज शिरसाट यासारखी असंख्य क्रीडापटूंची नावे घ्यावी लागतील. आज ज्या पद्धतीने तायक्वांदो खेळाच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याचे काम शहरात क्रीडा प्रशिक्षकांचे सुरू आहे, ते पाहता नगर शहरातून भविष्यात ऑलम्पिकसाठीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.
३१ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर स्पर्धा, ४ थी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्योरुगी तायक्वांदो स्पर्धा २०२२-२३, केंद्रीय विद्यालय मुंबई विभाग शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा अहमदनगर शहर जिल्हा क्रीडा काँग्रेसच्या पुढाकारातून व किरण काळे युथ फाउंडेशन, माय नगर फाउंडेशनच्या माध्यमातून केडगाव येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे बोलत होते. क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणाऱ्या अल्ताफ सर, गणेश वंजारे सर, अहमदनगर तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार नारायण कराळे सर, योगेश बिचितकर सर, तेजस ढोबळे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे सर या क्रीडा प्रशिक्षकांचा यावेळी शिक्षक दिनानिमित्त किरण काळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आल. काळे यांनी यावेळी स्पर्धेतील यश संपादित करण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्व क्रीडा प्रशिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी युवा नेते ॲड. वैभव कदम, ॲड. गजेंद्र पिसाळ, छायाचित्रकार मेहेत्रे, युवक काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस वैष्णवी तरटे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुरज गुंजाळ, विवेक तरटे, मंगेश आहेर, सचिन मरकड, मयुर अडागळे, ॲड. वैष्णवी ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यश संपादित केलेले सुरज खेळाडूंना एकलव्य तायक्वांदो अकॅडेमी, छत्रपती तायक्वांदो अकॅडेमी, स्वराज्य तायक्वांदो अकॅडेमी व अहमदनगर तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
नाशिक येथे पार पडलेल्या ३१ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर स्पर्धा, ४ थी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्योरुगी तायक्वांदो स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे : सुवर्ण पदक – कार्तिक अशोक काळे, प्रतिक प्रकाश शिंदे, विराज गजेन्द्र पिसाळ, आदिती धावड, सोनाली अशोक गिते, रौप्य पदक – अविष्कार अनिल गुंजाळ, पियुष राजाराम सहानी, कार्तिकी गणेश वंजारे, वनश्री अंकुश लष्करे, कांस्य पदक -सार्थक रंजन देवकर, क्षितीज गजेन्र्द पिसाळ, गार्गी धनंजय गुंड, प्रथमेश अनिल कावळे, ऋषिकेश पानसरे.
गोवा येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय मुंबई विभाग शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू पुढीलप्रमाणे : सुवर्णपदक विजेते खेळाडू – तन्मय दहिफळे, आदित्य धामणे, विराज पिसाळ, सुजल तोडकर, देवेंद्र पवार, रौप्य पदक – आदेश चव्हाण, कांस्य पदक – राहुल आंबेकर, कुणाल भापकर.
यावेळी बोलताना प्रवीण गीते पाटील म्हणाले की, खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली की त्यांना प्रोत्साहन मिळत असते. तेच काम किरण काळे युथ फाउंडेशन, माय नगर फाउंडेशन आणि शहर काँग्रेस क्रीडा विभागाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रास्ताविक क्रीडा प्रशिक्षक गणेश वंजारी यांनी केले. यावेळी खेळाडूंचे पालक, क्रीडाप्रेमी, तसेच केडगाव परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.