सामाजिक
देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे कोंभळी सर्कल प्रमुखपदी दिपक गावडे तर चांदे खुर्द वार्ताहरपदी अमोल गंगावणे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द या गावतील दोन तरुणाची सामाजिक कार्याची देशस्तंभ न्यूज नेटवर्कने दखल घेत त्यांना काम करण्याची संधी दिली आहे.गावातील दिपक गावडे यांची कोंभळी सर्कल प्रमुख वार्ताहर निवड करण्यात आली तर गावातीलच अमोल गंगावणे यांची चांदे खुर्द गावच्या वार्ताहरपदी निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संस्थापक संपादक महेश भोसले यांनी प्रदान केले.यावेळी त्यांच्या समवेत सामजिक कार्यकर्ते संजय ताकवाले उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल देशस्तंभ संपादक महेश भोसले,उप संपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे तसेच चांदे गावातील प्रतिष्ठित व नागरिकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.