वारंवार सत्त्ताबदल होत राहिला पाहिजे,काही दिवसांनी आमचे देखील सरकार येऊ शकते आम्ही नवीन राजकीय मित्राच्या शोधात आहोत:प्रा.जोगेंद्र कवाडे

अहमदनगर (प्रतिनिधी) कोरोनामुळे दोन वर्ष येता आले नाही.मुंबईला जाताना मंगलगेट चौकात कार्यकर्त्यांची भेट व्हायची.महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असून महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे शिवसेना,भाजप असे नवीन युतीचे सरकार आले आहे. असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना केले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या मातोश्री हेमाताई गायकवाड (पाटेकर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमास ते नगरला आले होते. पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,महाराष्ट्र प्रदेश नेते सुनिल शेत्रे, नितीन कसबेकर,शहर जिल्हाध्यक्ष महेश भोसले,सोमा शिंदे,युवक जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, विशाल गायकवाड,किरण जाधव,महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,राधा पाटोळे,हिराबाई भिंगारदिवे,रंजना भिंगारदिवे,मिरा गवळी, महेमुदा पठान,सुमन काळापहाड,शबाना शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा.कवाडे म्हणाले नवीन युतीच्या सरकारचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे .तो लोकशाहीचा नियम आहे. अडीज वर्षांनंतर सत्ताबद्दल झाला.वारंवार सत्ताबदल होत राहिला पाहिजे,काही दिवसांनी आमचे देखील सरकार येऊ शकते.त्यामुळे आमच्या पक्षाच्या अजेंड्याशी जो पक्ष सहमत असेल अशा नवीन राजकीय मित्राच्या आम्ही शोधात आहोत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा पक्ष घटकपक्ष असताना देखील सत्तेचा उचित वाटा देण्याचे सौजन्य मित्रपक्षांने दाखविले नाही.त्यामुळे येणाऱ्या लोकसभा,विधानसभा,जिल्हापरिषद,पंचायत समिती, महानगरपालिका निवडणूकीमध्ये स्वबळावर लढण्याची भूमिका आहे.नवीन आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने आतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकांची नासाडी झाली आहे.याबाबत आम्ही मुख्यमत्र्यांकडे प्रत्येक एक्करला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान तातडीने देण्याची मागणी केली आहे.शिवबा,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या होणे ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याचे ते म्हणाले,यावेळी बोलतांना ते म्हणाले मोदी सरकारने स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव “हर घर तिरंगा” या घोषणेने केला.त्याऐवजी “हर घर देश का झेंडा” व सोबतच “हर घर संविधान” ही घोषणा करणे गरजेचे होते.तशी आम्ही मागणीही केली होती. देश संविधान साक्षर होणे अत्यंत आवश्यक आहे.सविंधान साक्षरतेचा वेग वाढविणे गरजेचे आहे.त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात संविधानाचे शिक्षण असावे.त्यामुळे जनतेला आपले आधिकार व कर्तव्य याची जाणीव होईल.देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अस्पृश्य व दलितांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.राजस्थान मधल्या जालोर जिल्ह्यात इंद्र मेघवाल नावाच्या मागास विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे.याबाबतीत आमच्या पक्षाने सर्व ठिकाणी निषेध निदर्शने करत जातीयवादी मानसिकतेच्या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारचा एनसीआरबी रिपोर्ट असा आहे की देशातल्या दलित अत्याचारात महाराष्ट्रामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. भिमा कोरेगावच्या दंगली घडविणारे संभाजी भिडे,मिलिंद एकबोटे यांना अजूनही अटक झाली नाही.ही बाब लाजिरवाणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.युवकांच्या बेरोजगारीबद्दल ते म्हणाले पाकिस्तान व नेपाळ, बंगला देशापेक्षा आमच्या देशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे.अनेक उद्योग मोदी सरकारने विकून टाकले आहेत.आरक्षणाचे खाजगीकरण केल्यामळे आरक्षणाला वाव राहिला नाही.सार्वजनिक उपक्रमात देखील आरक्षणाची तरतुद असली पाहिजे. ही बाब आम्ही सरकारपुढे मांडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनु.जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्वृती २ वर्षापासून मिळाली नाही ती ताबडतोब मिळावी अशी आमच्या पक्षाने मागणी केली आहे.
राजकारण,समाजकारण,विकासकारन असले पाहिजे अलीकडचे राजकारण “सत्ताकारण” झाले असल्याचे ते म्हणाले,या सत्ताकारनामुळे देशात जाती धर्माचा उद्रेक होतो आहे.देशाची अखंडता धोक्यात आली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.कोणताही पक्ष संपविण्याएवढी ताकद भाजपामध्ये नसल्याचे ते बोलले रिपाई एक्याबाबत बोलतांना ते म्हणाले आमचा पक्ष केव्हाही एक्य करण्यास तयार आहे.प्रकाश आंबेडकर व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी एकत्र यावे. आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना स्वतः भेटून एकत्र येण्याविषयी बोलावे. शेवटी पाण्यावर काठी मारली तर पाणी तुटत नसल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.