सांत्वन

अशोक गेहलोत यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही राजस्थानात राष्ट्रपती राजवट लागू करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले जालोर येथील बळीत दलित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची आठवलेंनी घेतली सांत्वनपर भेट जालोर च्या दलित विद्यार्थी हत्येच्या निषेधार्थ रिपाइं तर्फे मुलुंड मध्ये कडकडीत बंद

जालोर/ मुंबई दि.21 – राजस्थान मध्ये दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. जालोर येथे अवघ्या 9 वर्षांच्या दलित बालकाची सवर्ण शिक्षकांसाठी पाणी प्यायल्यामुळे निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच संत राविनाथ यांनी जातीवादी छळातून आत्महत्या केली. राजस्थानात दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यास मुख्यमंत्री अशोक गेहलोत अपयशी ठरले आहेत. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिला नाही. त्यामुळे राजसथन सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. आज जालोर येथील सुराणा गावात दिवंगत इंद्रकुमार मेघवाल या 9 वर्षांच्या जातीवादाचा बळी ठरलेल्या दलित बालकाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. जालोर मधील बळीत विद्यार्थी दिवंगत इंद्र कुमार यांच्या कुटूंबाला समाज कल्याण तर्फे 8 लाखांची मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे 3 लाखांची सांत्वनपर आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. यावेळी सुराणा गावातील मयत दलित विद्यार्थी इंद्र कुमार आणि राजपूरा गावातील जातीवादी छळातून आत्महत्या केलेल्या संत राविनाथ महाराज या बाबत माहिती घेऊन दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी ची मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.यावेळी ना.रामदास आठवले यांच्या समवेत रिपाइं चे राजस्थान प्रदेश अध्यक्ष राधामोहन सैनी; रिपाइंचे राजस्थान प्रभारी ऍड.नितीन शर्मा; अशोककुमार भट्टी; जतीन भुट्ट; नवरत्न गोसाईवाल;उगमराज ;अशोक झालामंड आदी उपस्थित होते.
ना.रामदास आठवले यांनी जालोर ला आज भेट दिली असता त्याचवेळी आज मुंबईत मुलुंड मध्ये जालोर दलित विद्यार्थी हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे तर्फे प्रचंड निषेधार्थ मोर्चा काढून आज कडकडीत मुलुंड बंद पाळून जालोर दलित विद्यार्थी हत्येचा तिव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवन्त;श्रीकांत भालेराव; विनोद जाधव; सौ.शिलाताई अनिल गांगुर्डे; दादू झेंडे;गीतांबेन सोलंकी; अजित रणदिवे आदी अनेक रिपाइं नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.या निषेध मोर्चात मुलुंड मध्ये शेकडो रिपाइं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.मुलुंड मधील सर्व दुकानदार हॉटेल व्यावसायिक व्यापाऱ्यांनी आपले दुकान बंद ठेऊन जालोर मधील दलित विद्यार्थी हत्येचा तीव्र निषेध करीत मुलुंड मध्ये कडकडीत बंद पाळला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे