सामाजिक
२२ ऑगस्ट रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने!

अहमदनगर (प्रतिनिधी) राजस्थान येथे शिक्षकाने दलित विद्यार्थ्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे रा्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून निषेध करणार आहोत.तरी हजोरोंच्या संख्येने भीम सैनिकांनी या निदर्शनात सहभागी होऊन निषेध व्यक्त करावा.असे आवाहन पक्षाचे नेते प्रा. जयंत गायकवाड,नितीन कसबेकर, जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड,शहर जिल्हाअध्यक्ष महेश भोसले,सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे ,महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,विशाल गायकवाड,अतुल भिंगारदिवे,रौफ कुरेशी, आदींनी केले आहे.