राजकिय

योजना कागदोपत्री न राबविता, गरजू घटकापर्यंत पोहचवून त्या प्रत्यक्षात राबविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध -प्रा. माणिक विधाते

राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेलच्या माध्यमातून शहरातील मागासवर्गीय लोकवस्तीत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जागर

अहमदनगर दि.१३(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहर व उपनगरातील मागासवर्गीय समाजबांधवांची लोकवस्ती असलेल्या भागात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेलच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय घटकांसाठी राज्य सरकारच्या असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तर या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विविध योजनांची माहिती असलेल्या पत्रकाचे वाटप करण्यात आले.
शहरातील माळीवाडा येथील आंबेडकर नगर, सिध्दार्थनगर, रामवाडी आणि भिंगार येथील भिमनगर भागात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, प्रकाश वाघमारे, सतीष साळवे, मनोज आंबेकर, सिध्दार्थ आढाव, सृजन भिंगारदिवे, तेजस पाडळे, प्रशांत भोसले, संदीप वाघमारे, संजय दिवटे, दिनेश पंडित, सचिन शेलार, दिपक सरोदे, सुरेश वैरागर, समीर भिंगारदिवे, सागर विधाते, गौरव भिंगारदिवे, शुभम भिंगारदिवे, रवी पवार, सोनू साळवे, निखील कोल्हे, पिटर साळवे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने मागसवर्गीय समाजासाठी विविध योजना राबवून भरीव निधीची तरतूद केलेली आहे. योजना देण्याचे काम शासन करीत असून, लाभार्थींनी त्या योजना पदरात पाडून घ्याव्या. योजना कागदोपत्री न राबविता गरजू घटकापर्यंत पोहचवून त्या प्रत्यक्षात राबविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश बनसोडे म्हणाले की, कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन समाजाची परिस्थिती सुधारणार आहे. सरकारी योजना अनेक असून, त्याचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे खर्‍या लाभार्थ्यांना लाभ मिण्यासाठी हा जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून मागील दोन वर्षात सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय समाजासाठी स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्ति, बार्टीच्या विविध योजना, संत भगवानबाबा वसतीगृह योजना आदींसह समाजाचा विकासाच्या उद्देशाने सुरु असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे