मुकूंदनगर, येथून स्थानिक गुन्हे शाखेने केले 50,200/- (पन्नास हजार दोनशे) रु. किंमतीचे 150 (एकशे पन्नास) किलो गोमास व दोन जिवंत वासरे घेतले ताब्यात!

अहमदनगर दि.१३नोव्हेंबर(प्रतिनिधी) भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकूंदनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत 50,200/- (पन्नास हजार दोनशे) रु. किंमतीचे 150 (एकशे पन्नास) किलो गोमास व दोन जिवंत वासरे ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे. या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. श्री. राकेश ओला साहेब, यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष लोढे, पोकॉ/रोहित येमुल, सागर ससाणे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व अर्जुन बडे अशांना बोलावुन घेवुन अहमदनगर शहरात अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन करत असताना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मुकूंदनगर येथील छोटी मरीयम मशिदीचे पाठीमागे, पत्र्याच्या शेडचे आडोशाला इसम नामे सलीम चौधरी हा गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन, त्यांची कत्तल करुन गोमासची विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी लागलीच स्थागुशा पथकास बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच दोन पंचाना सोबत घेवुन मुकूंदनगर येथील छोटी मरियम मशिदीचे पाठीमागे पत्र्याच्या शेडचे आडोशाला जावुन खात्री केली असता 02 (दोन) इसम जनावराची कत्तल करुन मास तोडताना व आजु बाजुला रक्त सांडलेले दिसल्याने पथक छापा घालण्याचे तयारीत असतांना नमुद इसमांना पोलीस पथकाची चाहुल लागताच एक इसम पत्रा शेडचे आडोश्याचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. पथकातील इतर अंमलदारांनी नमुद ठिकाणी मिळुन आलेल्यास इसमास ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगितली व त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव 1) अब्दुल कादीर चौधरी, वय 19, रा. नालबंदखुंट, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गोवंश कत्तलखान्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदर कत्तलखाना हा सलीम अकबर चौधरी रा. नालबंदखुंट, अहमदनगर हा चालवत असुन गोमांस विक्री करत असल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे कब्जात 150 किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे, दोन लहान वासरु व कत्तलीसाठी लागणारी हत्यारे असा एकुण 50,200/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत पोना/विशाल अशोक दळवी ने. स्थागुशा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन 542/2022 भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कल 5 (क), (ब), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोस्टे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर, श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.