सांत्वन
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक कालकथित साळवे गुरुजींच्या घरी सांत्वनपर भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचे खंदे समर्थक अहमदनगर जिल्ह्याचे जेष्ठ नेते कालकथित लक्ष्मण साळवे गुरुजी यांचे काही दिवसापूर्वी वार्धक्याने निधन झाले (वय ९७) त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.कवाडे सर यांनी त्यांच्या कुटुंबाचे फोनवरून सांत्वन केले.
फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नुकतेच त्यांच्या राशीन येथील घरी जाऊन साळवे कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जयंत गायकवाड,कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे, माजी नगरसेवक अजय साळवे, नितीन कसबेकर,प्रा.संदीप पाखरे सर, राजू ससाणे, साळवे गुरुजींचे ज्येष्ठ सुपुत्र साळवे साहेब आदी उपस्थित होते.