लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून च्या वतीने सिव्हील हॉस्पिटल येथे अल्पोपहारचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रुग्णालय अहमदनगर च्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल ते दिल्लीगेट रॅलीचे नियोजन करण्यात आले होते इयरली मध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल व नोट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सदर रॅलीचे स्वागत लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउनचे संस्थापक श्रीकांत जी मांढरे क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व सचिव प्रसाद मांढरे यांनी केले. यावेळी अहमदनगर जिल्हा शल्यचिकीचक डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा विकास अधिकारी डॉक्टर शिवाजी जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम पानसंबळ, शासकीय निरीक्षक सौ शर्मिला मस्के, प्राध्यापक अमोल बागुल, रेडिओ सिटी चे श्री आर जे प्रसन्ना, तिरमलेश पासकंटी,अशोक बोज्जा,देविदास ईप्पलपेल्ली अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.
यावेळी जागतिक युवा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मीठांच्या वतीने अल्पोपार देण्यात आले. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व युवकांना क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे स्वागत प्रसाद मांढरे यांनी केले तर आभार तिरमलेश पासकंठी यांनी मानले.