रथ यात्रेत खिशावर हात मारणारे २० जण कर्जत पोलिसांच्या ताब्यात!

कर्जत (प्रतिनिधी) : दि २६ जुलै
कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांच्या रथयात्रेत भाविकांच्या खिशावर तर महिलांच्या गळ्यातील दागिने आणि पर्सवर हात मारणाऱ्या तब्बल २० सराईत चोरट्यांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये १० महिलांचा समावेश असल्याची माहिती पोनि चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव संपन्न झाला. दोन दिवसांत लाखो नागरीकांनी कर्जतमध्ये रथोत्सवासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरटे आपले कार्य सहज पार पाडत होते. मात्र यंदा त्यांना कर्जत पोलिसांनी चांगला हिसका दाखवत जेलची वारी दिली. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी,दागिने,रोकड,चोऱ्या करण्यासाठी असंख्य सराईत चोरटे परजिल्ह्यातून, परगावाहून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र ‘नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथयात्रा उत्साहात पार पाडायची’ असा संकल्प करून कर्जत पोलीस मैदानात उतरले होते. कुठेही गोंधळ होऊ नये, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी उत्कृष्ट नियोजन कर्जत पोलिसांनी केले होते. रथयात्रेवर २९ सीसीटीव्ही कमेऱ्यांची प्रत्येक नागरिकावर करडी नजर होती.त्यामुळे टवाळखोरांना आणि गुन्हेगारांना मोठा चाप बसला. चोऱ्या करण्यासाठी विविध जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या या सराईत चोरट्यांवर अगोदरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे. या कारवाईत तब्बल २० जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे: आर्यन अमिताभ निमगावकर ( कर्जत), आनंद रविंद्र पवार उर्फ टकशा ( जामखेड),
काजल कलाकार चव्हाण उर्फ काजल अविनाश काळे (वाकीता.आष्टी), निर्मला हनुमंत जाधव, हनुमंत मुड्या जाधव (लेखानगर नाशिक), अमोल जालिंदर काळे (अरणगाव जामखेड), किरण रावसाहेब काळे (जामखेड), सागर ताराचंद भागडे ( जामखेड), संतोष शंकर चव्हाण (उरुळीकांचन), राहुल रमेश जाधव( अकलूज), गोवर्धन सुरेश काळे ( जामखेड), कमल बबन फुलवरे, मंगल संभाजी शिंदे, शिला पप्पू फुलवरे (.गेवराई बीड), रोहिणी सुनील पिटेकर, स्वाती संतोष पिटेकर, राणी शरद पिटेकर (म्हाळंगी तालुका कर्जत), माया प्रवीण गायकवाड, सोनी जगत राकडे, इंदू आनंदा गायकवाड( वर्धा) वरील आरोपींवर जबरी चोरी, चोरी, चोरीचा प्रयत्न, संशयास्पद परिस्थितीत फिरणे अशा प्रकारचे गुन्हे कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. यातील पाच आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड सुनावण्यात आली. १२ अटक आरोपींवर अहमदनगर पुणे सोलापूर वर्धा येथे चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, पोलीस जवान श्याम जाधव, अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, सुनील खैरे, गोवर्धन कदम, शकील बेग, ईश्वर नरोटे, मनोज लातूरकर, कोमल गोफणे, राणी व्यवहारे, बळीराम काकडे, जयश्री गायकवाड, भरत डगोरे, सलीम शेख, उद्धव दिंडे प्रवीण अंधारे, शाहुराज तिकटे यांनी पार पाडली.
******* यात्रेतील टारगटांना लगाम
यापूर्वी यात्रा काळात टुकार आणि टारगट वृत्तीच्या तरुणांमुळे विद्यार्थिनी- महिला वर्गांना मनस्ताप घडत होता. त्यामुळे महिला मनोरंजन नगरीत फिरताना त्रस्त असायच्या मात्र यंदा प्रथमताच पोनि यादव आणि कर्जत पोलिसांनी मनोरंजन नगरी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणल्याने हा त्रास जवळपास बंदच दिसला. काही तरुण मुले त्रास देण्याच्या मानसिकतेमध्ये निदर्शनास आल्यास पोलिसांनी त्यांना दंडुक्याचा प्रसाद दिला.