श्री आनंद महाविद्यालयात टी.वाय बी.एस.सी च्या विद्यार्थ्यांना निरोप व आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार!

पाथर्डी दि.५ जुलै (प्रतिनिधी)
श्री आनंद महाविद्यालयात विज्ञान शाखेतील टी. वाय. बी. एससी .च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी, सदिच्छा समारंभ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवलेले आहे. अशा आजी-माजी विद्यार्थ्यांचा ही गौरव या कार्यक्रमा प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकताच उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झालेले आसिफ पठाण व संतोष पागर यांना निमंत्रित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार होते.
महाविद्यालयातील आपले तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण करून, पुढील वाटचाली करता महाविद्यालयातील एस. वाय. बी .एससी. च्या वर्गाने ‘सेंड ऑफ’ अर्थात निरोप समारंभ आयोजित केला होता .या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त करून महाविद्यालयातील विविध आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाने आम्हाला भरभरून दिले, आता आम्ही पुढच्या वाटचाली करता या महाविद्यालयातून जे ज्ञान मिळाले त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही करणार आहोत. असे विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. हे सांगत असताना काही विद्यार्थ्यांनी आपल्या अंतकरणातील भावना याही या प्रसंगी व्यक्त केल्या . प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असे पठाण याने बोलताना यशाला कोणताही शॉर्टकट नसतो यश हे अवघड असले तरी अशक्य नाही आपण सुद्धा या यशाला गवसणी घालू शकता फक्त आपले कष्ट आपला प्रामाणिकपणा व आपली निष्ठा हेच आपल्या यशाचे खरे गमक आहे ते पाळले तर जीवनात आनंद हा निर्माण होणारच आहे तर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष पागर
यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचा उत्साह व मनोबल वाढवण्याचे काम केले स्पर्धा परीक्षा हे कठीण क्षेत्र आहे पण अशक्य नाही हे त्यांनी आवर्जून सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचाली करता शुभेच्छा देऊन महाविद्यालयातील अध्यापन अध्ययन सोयींचा आपण कशा पद्धतीने उपयोग करता यावर आपले पुढचे करियर अवलंबून असते हे त्यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. जगन्नाथ बरशिले डॉ. अनिल गंभीरे प्रा सूर्यकांत काळोखे डॉ नितीन ढुमणे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्या खोर्दे, सूत्रसंचालन अर्चना काकडे तर आभार ओंकार पवार याने मानले.