गुन्हेगारी
विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर आयजीच्या पथकाचा छापा! मुख्य लॉटरी चालक पसार!

नगर दि.५ जुलै (प्रतिनिधी):-शहरात सुरु असलेल्या विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर आयजीच्या पथकाने धडक छापेमारी केली असुन एकूण १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.यात आयजी पथकाने एकूण १ लाख ४० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन याबाबत कोतवाली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. / २०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम ४ व ५ सह लॉटरी (विनियमन) अधिनियम १९९८ चे कलम ७ (३), ९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई ही मा. श्री. डॉ. बी. जी. शेखर पाटील सो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी पो. निरीक्षक श्री/बापु रोहोम,सपोनि/सचिन जाधव,पो.हवा. शेख शकील अहमद,पोहवा/सचिन दिलीप धारणकर, पोना/कुणाल सुरेश मराठे,पोना/प्रमोद सोनु मंडलीक यांनी केली आहे.