पत्रकार वजीर शेख यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान

पाथर्डी (प्रतिनिधी)
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार पत्रकार वजीर शेख यांना नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी नामदार राजेश टोपे (आरोग्य मंत्री महाराष्ट्रराज्य),नामदार नरहरी झिरवाळ (उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा),खासदार हेमंत आप्पा गोडसे (नाशिक लोकसभा मतदार संघ),आमदार डॉ.सुधीर तांबे(सदस्य नाशिक पदवीधर मतदार संघ),मा.श्री. भाऊसाहेब वाकचौरे (मा.खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ),मा.श्री.एकनाथराव ढाकणे (राज्य अध्यक्ष, महाराष्ट्रराज्य ग्रामसेवक युनियन),मा.डॉ.एस.एस.मगर(मा. कुलगुरू बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, वाघोली)ह.भ.प.विजयराव तनपुरे महाराज (शिवशाहीर,राहुरी)मा.यादवराव पावसे संस्थापक सरपंच सेवा संघ,मा.राजेंद्र गरुड महाराज,सौ.प्रमिला एखंडे(महिला अध्यक्ष सरपंच सेवा संघ) ,मा.रविंद्र पवार( राज्य संघटक सरपंच सेवा संघ),मा.रविंद्र पावसे(कार्याध्यक्ष सरपंच सेवा संघ) ,अमोल शेवाळे(राज्य संपर्कप्रमुख सरपंच सेवा संघ),रोहित संजय पवार(प्रदेशाध्यक्ष सरपंच सेवा संघ), मा.जयकुमार माने(राज्यउपाध्यक्ष सरपंच सेवा संघ ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार वजीर शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सरपंच सेवा संघाचे संस्थापक मा.बाबासाहेब पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.सामाजिक-राजकीय व मित्रपरिवारामधून पुरस्कार मिळाल्याबद्दल वजीर शेख यांचे अभिनंदन केले जात आहे.