भूसंपादन कार्यालयात कर्मचाऱ्यास पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले! अँटी करप्शनचा सापळा यशस्वी!

नगर दि.४ जुलै (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि.०४/०७/२०२२ रोजी यशस्वी झाला आहे.भूसंपादन कार्यालयातील मंगेश ढुमणे (लोकसेवक) या कर्मचाऱ्याला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.तक्रारदाराने आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषिक परवानगी करता ना हरकत प्रमाणपत्रासाठी भुसंपादन विभागात प्रकरण दाखल केले .होते.सदरचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर आरोपी लोकसेवक मंगेश ढुमणे याने तीन हजारांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.दि.१/०७/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान आरोपी ढुमणे याने पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित चार हजार मागितले होते.सोमवार दि.०४/०७/२०२२ रोजी चार हजार रुपये घेताना आरोपी ढुमणेला रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर,पोलिस निरीक्षक श्री.शरद गोर्डे,गहिनीनाथ गमे,पोना/रमेश चौधरी,विजय गंगुल,पोलिस अंमलदार/ रविंद्र निमसे,मपोना/राधा खेमनर,संध्या म्हस्के,चालक पोलिस हवालदार/हरून शेख,राहुल डोळसे यांनी केली.