सामाजिक
क्रांतिवीर यशवंत नाईक स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

अंभोरे दि.६ जुलै (प्रतिनिधी) आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित क्रांतिवीर भागोजी नाईक व यशवंत नाईक स्मारक निर्माण समिती चे वतीने ५ जुलै स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मा. पांडुरंग माळी सचिव सुरेश बागुल यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील अंभोरे याठिकाणी क्रांतिवीर यशवंत नाईक यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश अध्यक्ष विठ्ठल माळी सचिव भागवत बेळे कार्य सचिव भाऊसाहेब खरूसे दत्तू घोलवड संजय शिंदे कार्याध्यक्ष रामू मोरे सचिन माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे संस्थापक,अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड जिल्हाध्यक्ष अशोक जाधव सामाजिक कार्यकर्ते अनिल बिडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.