निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने मोफत पार्लर प्रशिक्षण
शेकडो तरुणींना मिळणार या प्रशिक्षणाचा मोफत लाभ!

पारनेर दि.१६ जून (प्रतिनिधी) :
मतदार संघातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे . हा मनोदय ठेवत पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमीच आग्रही असतात . यापुर्वीही अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत . निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेची स्थापना करून महिलांसाठी विविध उपक्रम आजवर राबवले गेले आहेत .माझी माता-भगिनी ही आर्थिक सक्षम झाली पाहिजे , तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे कारण महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब सक्षम व सुशिक्षित होते ही दूरदृष्टी ठेवून आमदार निलेश लंके यांनी दिनांक 15 जून रोजी माननीय श्री निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत पार्लरच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला . महिलांचे सक्षमीकरण करण्याचा निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेचा मुख्य हेतू असून महिला स्वतः आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी यादृष्टीने संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविताताई ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय सौ.राणीताई निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला . या प्रशिक्षला पारनेर शहरातील महिलांनी व युवतींनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे .
पारनेर मध्ये सुरु केलेल्या या ब्युटी पार्लर प्रशिक्षणास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून , थोड्या दिवसात मतदार संघातील अनेक गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल असेही यावेळी निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ.सविता ढवळे यांनी सांगितले .
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ .राणीताई निलेश लंके संस्थेचे अध्यक्षा सौ . सविताताई ढवळे यांच्या सह अनेक महिला युवती तसेच संस्थेच्या संचालिका मयुरी ताई औटी, पठारेताई ,सीमाताई पवार तसेच नानी बोरुडे, दीपिका बोरुडे, सौ ज्योती देशमुख, स्वाती बोरुडे, सीमा देशमुख उमाताई बोरुडे,सर्व संचालिका कर्मचारी वृंद तसेच अनेक महिला भगीणी या वेळी उपस्थित होत्या.सदर संस्थेने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातील माता-भगिनी कडून कौतुक करण्यात येत आहे . तरी मोठ्या संख्येने या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था व जिल्हा परिषद सदस्य सौ . राणीताई निलेश लंके यांनी केले आहे .