आराध्या युवा प्रतिष्ठान व पॅसिफिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न
आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बांगरे बंधूंचा उपक्रम...

नगर दिं.१६ जून (प्रतिनिधी )- आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पॅसिफिक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व आराध्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने कायनेटिक चौक येथे पॅसिफिक हॉस्पिटल मध्ये मोफत भव्य सर्वरोग तपासणी शिबिर तसेच 50 टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी आराध्य युवा प्रतिष्ठानचे निलेश बांगरे, बाली बांगरे,डॉ. शशिकांत फाटके, डॉ.प्रशांत जाधव, डॉ. दीपक कळमकर, डॉ. बलराज पाटील, डॉ. तुषार कोहक, पै.संदेश इंगळे, संभाजी पवार, दादा दरेकर, गजेंद्र भांडवलकर, दीपक लोंढे, गणेश पेटारे, सोमा रोकडे, सचिन पवार, अजय शिंदे, बंटी जाधव, शरद दळवी, भैय्या फिटर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला या शिबिरामध्ये मोफत शुगर तपासणी, सर्वरोग तपासणी व निदान, सवलतीच्या दरात रक्ताची तपासणी, सवलतीच्या दरात एक्स-रे , सिटी स्कॅन, सोनोग्राफी तपासणी करण्यात येणार आहे तर 50 टक्के सवलतीत शस्त्रक्रिया होणार तर शिबिरा निमित्त एका रुग्णाची शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आली असल्याची माहिती निलेश बांगरे यांनी दिली.