संगमनेरची आजची उपस्थिती हीच विजयाची खात्री नि जिल्ह्याला प्रेरणा – जिल्हाध्यक्ष -नारायण राऊत
संगमनेर तालुका सदिच्छा मंडळ निवडणूक कार्यालय उदघाटन

संगमनेर दि.१५ जून (प्रतिनिधी)
वटसावित्री पौणिमेच्या शुभ मुहूर्तावर संगमनेर तालुका सदिच्छा मंडळाच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सदिच्छा मंडळाचे जिल्हा नेते राजेंद्र शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक नेते रविंद्र पिंपळे यांनी भूषविले
याचे समवेत उच्चाधिकारचे शिक्षक नेते गजानन ढवळे ,संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.माधवराव हासे, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, शिक्षक नेते रवींद्र पिंपळे, संघाचे कार्यकारी अध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे, पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रहेमान शेख, शिक्षक नेते .भास्करराव कराळे, मा.चेअरमन नवनाथ तोडमल मा.संचालक,सुदाम भागवत ,जामखेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे,कोपरगावचे तालुकाध्यक्ष श्री.विनोद सोनवणे,राहत्याचे तालुकाध्यक्ष संतोष भोत,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष .बाबासाहेब मते,कोपरगाव तालुका संघटक.रामदास गव्हाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.व्हा.चेअरमन .संतोष दळे यांनी केले.अध्यक्षीय सूचना संगमनेर तालुका संघाचे अध्यक्ष .पोपट काळे यांनी मांडली तर सुचनेस अनुमोदन श्रीम.दिपाली रेपाळ मॅडम यांनी दिले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्ज्ञानेश्वर माळवे* यांनी संघाची भूमिका समजावून देत ,सदिच्छा मंडळाची आगामी भूमिका यावर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सर्वांची मने जिंकून घेतली.जेष्ठ नेते उच्चाधिकारचे गजानन ढवळे यांनी सदिच्छा मंडळाचा आजवरचा कारभार नि पुढील नियोजन यावर प्रकाश टाकला.सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत संगमनेरच्या आजच्या उपस्थितीचे विशेष कौतुक करत आजची संगमनेर तालुका सभासद विशेष करून महिला उपस्थिती ही उद्याच्या विजयाची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला.
संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव हासे यांनी सदिच्छा मंडळ हे मातृस्थानी असले तरी आजही सदिच्छा मंडळ जिल्ह्याच्या पितृ मंडळाची जबाबदरीपूर्ण भूमिका बजावत असल्याचे मत स्पष्ट करत उद्याच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी महिला भगिनींनी भूमिका मांडताना श्रीम.दिपाली रेपाळ,श्रीम.सविता भुसाळ,श्रीम.अनिता एखंडे यांनी भगिनी या नेहमीच सदिच्छा मंडळाच्या बरोबरच आहेत.या वेळी मात्र सर्व भगिनी या सक्रिय प्रचारात भाग घेणार असल्याचे नमूद करत.भगिनीच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल असलेली उणीव यावेळी आम्ही नक्की भरून काढून सदिच्छा मंडळाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलू असे आश्वासन दिले.
त्यानंतर सदिच्छा जिल्हा नेते राजेंद्र शिंदे यांनी सदिच्छा मंडळाची आजची भूमिका स्पष्ट करत जिल्ह्यातील इतर मंडळे स्वबळाची भाषा करत असले तरी त्या फक्त वलग्ना असून आपली भूमिका मात्र स्पष्ट नि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची असल्याचे स्पष्ट करत ,संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पुन्हा एकदा सदिच्छा मंडळाकडे लागले असल्याचे नमूद केले.*कारण या निवडणुकीत किंगमेकर बनण्याची किमया फक्त सदिच्छा मंडळाच करू शकते असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे शेवटी संगमनेर तालुका शिक्षक संघाचे मा.तालुकाध्यक्ष चंद्रकांत कर्पे यांनी सर्व उपस्थितांचे व जिल्हा श्रेष्ठी यांचे आभार मानले.कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्र संचलन संगमनेर तालुका संघाचे सरचिटणीस संजय कडलग यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले.