अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ठामपणे समाजामागे खंबीरपणे उभे राहू : ॲड सुनील मगरे

अहमदनगर दि.१५ जून (प्रतिनिधी) : गेल्या सात वर्षापासून माननीय न्यायालयात जवखेड हा खटला सुरू होता या खटल्याची पूर्णतः सखोल चौकशी करून आमच्या टिमनी न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे या केस मध्ये बऱ्याच अडचणी आल्या परंतु सर्व अडचणींना ठामपणे आमच्या टीमने उत्तर दिले येणाऱ्या काळातही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही ठामपणे समाजामागे खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन ॲड.सुनील मगरे यांनी केले.तसेच खरे आरोपी कोण यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.आरोपी नसताना खुनाच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेल्या पीडितांची मानसिक शारीरिक जी मानहानी झाली त्याची भरपाई तर भरून निघणार नाही परंतु त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जवखेड प्रकरणातील औरंगाबाद खंडपीठातील वकिलांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी सत्कार मूर्ती ॲड.सुनील मगरे,ॲड.छगन गवई, ॲड.नितीन मोने,ॲड.सिद्धार्थ उबाळे, प्रमुख पाहुणे न्यायालयातील सीनियर ॲड.एस आर बोदडे, पारधी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ता मच्छिंद्र पिटेकर, ॲड.अरुण चांदणे, ॲड.आनंद सुर्यवंशी, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, समवेत जिल्हा महासचिव योगेश साठे,आबासाहेब रामफले,प्रवीण ओरे,सुनील भिंगारदिवे,गौतम आढाव,गौतम सैंदाने,पत्रकार प्रकाश साळवे सर,जीवन पारधे, सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे,संदीप गायकवाड,प्रमोद आढाव,छावा संघटनेचे मनोज कर्डिले,अशोक देवडे, ढगे पाटील,फिरोज पठाण,सुनील गायकवाड, पोपट जाधव,विकास गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवंत गायकवाड,शहर अध्यक्ष राहुल कांबळे सह,रवींद्र कांबळे, आदिनाथ ठोंबे, लक्ष्मण माघाडे, सागर ढगे,अमर निरभवणे, प्रवीण ओरे,मारुती पाटोळे, आरपीआयचे आठवले गट युवा जिल्हाध्यक्ष अमित काळे, आरपीआय आंबेडकर गटाचे संदीप वाघमारे, ग्रामपंचायत सरपंच सुरेगाव प्रसाद रामफळे,वंचित बहुजन महिला आघाडी स्तुती सरोदे,धनश्री शेंडगे सह अन्य महिला पदाधिकारी आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की जामखेड प्रकरणातील या चारही वकिलांनी पूर्ण सात वर्ष न्यायालयात हा खटला चालवत असताना त्या कुटुंबाची देखील सर्व काळजी घेतली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून या वकिलांनी हा खटला पूर्ण जिद्दीने लडला व त्यात यशस्वी झाले. आपण सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी जातपात न बघता न्याय हक्कासाठी लढावे व ज्या नागरिकांवर खरोखर अन्याय झाले असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी पूर्ण पणे उभे आहे असे ते म्हणाले
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव योगेश साठे आपल्या मनोगतात म्हणाले की या सर्व खटल्यामध्ये वकिलांनी जो संघर्ष केला. त्या संघर्षाचा आभार मानावे तेव्हढे कमीच आहे.ॲड.सुनील मगरे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी सहा सात वर्ष या खटल्यामध्ये विनामूल्य स्वखर्चाने केस लढवून सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ भावनेने कामकाज पाहीले.गरीब कुटुंबावर अन्याय अत्याचार होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला भविष्यात अशीच वकिलांची फौज प्रत्येक जिल्ह्यात उभी राहील अशी अपेक्षा करतो.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात इथल्या शोषित पीडित वंचित घटकांना होणाऱ्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ज्या कायद्यांची तरतूद केली आहे त्याची पायमल्ली २०१४ च्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारने केली आहे. भारतीय संविधानाची बदनामी कशी होईल याकडे इथले प्रस्थापित राज्यकर्ते करत आहे.जवखेडे प्रकरण झाल्यानंतर जाती जातीत द्वेष वाढत होताना आपल्याला दिसून येत आहे.ॲट्रॉसिटी कायद्याविषयी गैरसमज पसरविण्याचे काम इथले मनुवादी करीत आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अन्याय झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम शेवटपर्यंत करेल असे ते म्हणाले. यावेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शैनेश्वर पवार व आभार प्रदर्शन जीवन पारधे यांनी मानले.