आ. रोहित पवारांनी वाराणसीवरून आणलेल्या पवित्र गंगाजलाने होणार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांना अभिषेक

कर्जत (प्रतिनिधी) : दि १५ जून
कर्जत जामखेडचे आ रोहित पवार नुकतेच देशाच्या विविध राज्यातील अनेक धार्मिक स्थळांची यात्रा करण्यासाठी गेले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वाराणसीच्या विश्वेश्वराची पूजा, अभिषेक व गंगाआरती केल्यानंतर आपल्या धर्मात अध्यात्माला आणि तीर्थक्षेत्राला असलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यावेळी मतदारसंघासह महाराष्ट्राच्या विविध भागातील धार्मिक व आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी ह्या गंगाजलाने अभिषेक करण्याची कल्पना त्यांना सुचली.
गंगाजलाचे शेकडो कलश तयार करून राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक तीर्थस्थळी ते पाठवण्यात येत आहेत. याचा शुभारंभ कर्जत शहरातून ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज यांच्या मंदिरापासून बुधवार, दि १५ रोजी आ रोहित पवारांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्व पुजारी, विश्वस्त आणि राजकीय पदाधिकारी हजर होते. सर्व विविध भागातील धार्मिक स्थळांची यादी बनवून त्याकडे स्वतः विशेष लक्ष देत आ रोहित पवारांनी राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळांना हे गंगाजल पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. हजारो किमी प्रवास करून हे गंगाजल संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचवले जाणार आहे. हजारो किमी प्रवास करून हे पवित्र गंगाजल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रमुख अध्यात्मिक व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाणार आहे. राज्याच्या व देशाच्या कल्याणासाठी स्थानिक प्रथेनुसार पूजा – अभिषेक करून संबंधित देवस्थानच्या पुजारी, विश्वस्त यांनी प्रार्थना करावी अशी विनंती आ रोहित पवार यांनी पत्र लिहून सर्व प्रमुखांना केली आहे. या माध्यमातून आपली परंपरा जपण्याचा व ती पुढे नेण्याचा प्रयत्न आ पवार सर्वाना सोबत घेत करीत आहे. अशा पद्धतीनेच स्वराज्य ध्वजाने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात हजारो किमी प्रवास केला होता त्यानंतर त्याची उभारणी खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्यावर करण्यात आली होती.