कौतुकास्पद

65 वर्षापासून हिंदू भाडेकरूने मशिदीची जागा मशिदीला विनामोबदला स्वखुषीने केली परत दो बोटी चिरा मस्जिद व दर्गा ट्रस्टच्यावतीने धनराज शशिकुमार गाडे यांचा सत्कार!

अहमदनगर दि.१३ जून (प्रतिनिधी)- भाडेकरू जागा मालक यांची वादावादी सर्वश्रुत आहे. जागा मंदिराची असो किंवा मशिदीची जुने भाडेकरूंना जागा खाली करण्यावरून अनेक वेळा वाद होताना दिसतात. मात्र शहरात 65 वर्षापूर्वीच्या आजोबांच्या काळात मशिदचे भाडेकरू असलेल्या एका हिंदू व्यक्ती पंचफुला संदिपान गाडे यांच्या ताब्यात असलेली मशिदची जागा मशिदीला विनामोबदला स्वखुषीने पंचफुला संदिपान गाडे यांच्या नातू धनराज शशिकुमार गाडे व शुभम जाधव यांनी परत दिली आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेले दो बोटी चिरा मस्जिद व दर्गा ट्रस्ट आहे. या मशिदीच्या जागेत आजोबांच्या काळापासून भाडेकरू असलेले धनराज गाडे यांनी मशिदीला जागेची आवश्यकता असताना भाडे पोटी वापरत असलेले १५०० स्केअर फुट ची जागा विनामोबदला स्वखुषीने मस्जिद ट्रस्टला परत दिली. गाडे यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दो बोटी चिरा मस्जिद व दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी आयुब हाशम शेख, मुनाफ बागवान, आबिद हुसेन, पै.उजेर सय्यद, शहनवाज बागवान, आयुब बाबु, मतीन जहागीरदार, अँड.नदीम सय्यद, मजीद सय्यद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
धनराज गाडे यांचे आजोबा यांनी 65 वर्षांपूर्वी मशिदीच्या जागेत असलेल्या व्यवसायिक गाळा व रहाते घर ४० ते ५० रुपये दरमहा भाड्याने घेतला होता. मस्जिदच्या जागेची आवश्यकता असताना व त्यांचे देखील इतर ठिकाणी स्वतःचे घर होऊन परिस्थिती चांगली झाली असताना त्यांनी मस्जिदला स्वखुषीने सदर जागा कोणताही मोबदला न मागता परत दिली आहे.
शहरात अनेक ठिकाणी मशिदच्या जागेत जुने भाडेकरू आहेत. जेव्हा मशिदच्या जागेची गरज पडते तेव्हा जुने भाडेकरू स्वखुशीने जागा सहजासहजी परत करत नाही. भाडे कमी असल्याने इतर ठिकाणी जागा घेऊन देखील मशिदच्या जागा स्वतःच्या ताब्यात ठेवली जाते. त्यामुळे अनेकदा वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गाडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मशिदची जागा मशिदला देऊन एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना दो बोटी चिरा मज्जित व दर्ग ट्रस्टचे ट्रस्टी यांनी व्यक्त केली. व सदर जागेसाठी अँड.नदीम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे