अहिल्यानगर दि. 2 डिसेंबर (प्रतिनिधी )मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री व्यावसायिकांविरूध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, अतुल लोटके, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल सोळंके, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, रोहित येमुल, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन पथकास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
दिनांक 01/12/2024 रोजी सकाळी 08.00 वा.सुमारास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढत असताना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेंडीगेट, अहिल्यानगर परिसरामध्ये अरबाज गुल्लु कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर याचे घराचे पाठीमागील बाजुस गोवंशी जातीचे जिवंत जनावराची कत्तल करत आहे. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता दोन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन, त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे 1) इरफान एजाज कुरेशी, वय 38, रा.आंबेडकर चौक, झेंडीगेट, अहिल्यानगर 2) रफिकउल जुनाब परामल, वय 28, रा.बाबा बंगाली, झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.त्यांचे ताब्यामधुन 9,06,000/- रू किं. 3020 किलो वजनाचे गोमांस, 3,000/- रू किं. इलेक्ट्रीक काटा व 200/- रू किं.लोखंडी सुरा असा एकुण 9,09,200/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या गोमांसबाबत चौकशी केली असता त्यांनी 3) अरबाज गुल्लु कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर 4) निहाल इस्माईल कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर यांनी गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी आणले असून त्यांच्याच सांगणेवरून गोवंशीय जनावराची कत्तल केल्याचे सांगीतले. वर नमूद 04 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1257/2024 बीएनएस कलम 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 01/12/2024 रोजी तपास पथकास 22 नंबर मस्जीदसमोर, व्यापारी मोहल्ला, अहिल्यानगर येथे तौसीफ सादीक कुरेशी, रा.कुरेशी मस्जीद जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरत असून काही गोवंशी जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमदू ठिकाणी जाऊन खात्री केलीअसता पत्र्याचे शेडमध्ये 08 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले.त्याठिकाणी गोवंश जातीचे जनावरे बांधुन ठेवलेली दिसून आल्याने इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी 1) तौसीफ सादीक कुरेशी, वय 34 2) इरफान फारूक कुरेशी, वय 38 3) समत बाबुलाल कुरेशी, वय 47 4) शफिक नूर कुरेशी, वय 60 5) फिरोज फारूक कुरेशी, वय 32 6) अरकान अशिफ कुरेशी, वय 21 7) सादिक गुलामनबी कुरेशी, वय 40 व 8) शहारिक रशीद कुरेशी, वय 30 सर्व रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन त्यांचेकडून व घटनाठिकाणावरून 1,40,000/- रू किंमतीच्या गोवंश जातीचे 7 कालवड, 25,000/- रू किंमतीचा एक गोवंश जातीचा बैल, 70,000/- रू किंमतीचा गोवंश जातीचे 7 वासरे, 12,36,000/- रू किंमतीचे 4120 किलो गोमांस, 2,000/- रू किंमतीचा वजन काटा, 200/- रू किंमतीचा लोखंडी सुरा व 75,000/- रू किंमतीचे 5 मोबाईल असा एकुण 15,48,200/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ताब्यातील 8 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1258/2024 बीएनएस कलम 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यातील 12 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ताब्यातील आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे एकुण 24,57,400/- रूपये किंमतीचे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा