देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 11 डिसेंबर ( प्रतिनिधी )मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री व्यावसायिकांविरूध्द कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, गणेश लोंढे, अतुल लोटके, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन पथकास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
दिनांक 09/12/2024 रोजी 5.00 वा.सुमारास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढत असताना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झेंडीगेट, शाळा क्र.04 चे पाठीमागे हाफीज जलील कुरेशी, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह गोवंशी जातीचे काही जिवंत जनावराची कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबुन ठेवलेले आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता घटनाठिकाणी गोवंश जातीची जिवंत जनावरे बांधुन ठेवलेली मिळून आली.जनावरे कोणाच्या मालकीची आहे याबाबत विचारपूस केली असता नमूद जनावरे ही 1) हाफीज जलील कुरेशी (फरार) 2) गुफरान हाफीज कुरेशी (फरार) 3) अल्ताफ खलील कुरेशी (फरार) सर्व रा.झेंडीगेट, अहिल्यानगर यांची असल्याची खात्री झाली. घटनाठिकाणावरून 65,000/-रू किंमतीच्या दोन जिवंत गायी मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. वर नमूद 03 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1295/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 09/12/2024 रोजी तपास पथकास आंबेडकर चौक, झेंडीगेट अहिल्यानगर येथे अरबाज गुलामरसुल कुरेशी, रा.कुरेशी मस्जीद जवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह बंदीस्त जागेत गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल केली आहे, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमदू ठिकाणी पंचासमक्ष जाऊन खात्री केलीअसता बंदीस्त जागेमध्ये 02 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आल्याने त्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी 1) रफीकउल इस्लाम जमालुद्दीन इस्लाम, वय 19, रा.काली मस्जीद, झेंडीगेट, अहिल्यानगर 2) हानसेन हारून कुरेशी, वय 20, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.पंचासमक्ष घटनाठिकाणावरून 12,36,000/- रू किं. 4120 किलो गोमांस, 200/- रू किंमतीचा लोखंडी सुरा असा एकुण 12,36,200/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
ताब्यातील आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी 3) अरबाज गुलामरसुल कुरेशी (फरार) 4) शादाब गुलामरसुल कुरेशी (फरार) दोन्ही रा.कुरेशी मस्जीदजवळ, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर याचे सांगणेवरून जनावरांची कत्तल केली असल्याची माहिती सांगीतली आहे. वरील 04 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 1296/2024 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ)(ब) (क) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडून वरील दोन्ही कारवाईमध्ये 07 आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ताब्यातील 02 आरोपीतांना गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे एकुण 13,01,200/- रूपये किंमतीचे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा