आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित क्रांतिवीर भागोजी नाईक व यशवंत नाईक स्मारक निर्माण समितीची साकुर येथे स्थापना

साकुर दि.१३ जून (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील साकुर येथे नुकतीच
आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित क्रांतिवीर भागोजी नाईक व यशवंत नाईक स्मारक निर्माण समितीची स्थापना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी क्रांतिवीर भागुजी नाईक व यशवंत नाईक स्मारक निर्माण समितीच्या अध्यक्षपदी माननीय सुषमाताई बोरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी संगमनेर तालुक्यातील खराडी येथील पांडुरंग माळी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मधुकर साळवे सर आदिवासी प्रबोधनचे विठ्ठल माळी ग्रामविकास प्रतिष्ठानचे सुरेशदादा बागुल अशोक नाईक ,रामनाथ बर्डे, चंद्रशेखर रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी देशस्तंभचे संपादक महेशभाऊ भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौतमी भिंगारदिवे हे देखिल उपस्थित होते .
कार्यक्रमाप्रसंगी मधुकर साळवे विठ्ठल माळी संजय गांगुर्डे रामनाथ बर्डे सुषमाताई बोरसे, देशस्तंभ चे संस्थापक संपादक महेश भोसले, जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे, लताबाई माळी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी
संगमनेर तालुक्यातील साकुर या ठिकाणी आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन क्रांतिवीर भागोजी नाईक व यशवंत नाईक स्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष माननीय सुषमाताई बोरसे कार्याध्यक्ष पांडुरंग माळी सचिव सुरेश भाऊ बागुल आधी कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.