साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात आ. संग्राम जगताप
'शब्दगंध' साहित्य पुरस्कार वितरण

राहुरी दि.१३ जून (प्रतिनिधी) – आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यिक हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात, ‘शब्दगंध’ ने लिहित्या हातांचे कौतुक करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकल्याने लिहिणाऱ्याना निश्चितच बळ मिळेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव पांडुळे होते. विचारपीठावर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, कवी चंद्रकांत पालवे,भाऊसाहेब सावंत, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, ग्रामीण भागातील नवीन लिहिणाऱ्या लेखकांना शब्दगंध च्या माध्यमातून चांगली दिशा मिळत असून उद्याचे भावी लेखक त्यातून तयार होतील, राज्यस्तरावर स्पर्धा आयोजित केल्यामुळे लेखकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत आहे ही चांगली संकल्पना शब्दगंध राबवीत आहे.
गणेश मरकड बोलताना म्हणाले की, राज्यांमध्ये साहित्यिक क्षेत्रात ज्या नामवंत संस्था आहेत,त्या संस्थांमध्ये शब्दगंध चा आता उल्लेख होत असून लेखकांना पाठबळ देण्याचे काम शब्दगंध सातत्याने करत आहे.
यावेळी डॉ. संजय कळमकर आपल्या मुख्य भाषणात म्हणाले की, कसदार साहित्य ग्रामीण भागात निर्माण होत असून आपल्या मायबोलीतून समाजाचे प्रश्न,अडीअडचणी,सुख दुःख नवीन लेखक मांडत आहेत, त्यामुळे नव्या लेखकांना अशा प्रकारचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शब्दगंध आपली चोख भूमिका बजावत आहे, भाऊसाहेब सावंत, प्राचार्य जी.पी.ढाकणे, लेविन भोसले,चंद्रकांत पालवे यांनी मनोगत व्यक्त केले.
धुळे येथील अभिनव खानदेश चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी, हरिभाऊ नजन,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, मधुसूदन मुळे,डॉ.शंकर चव्हाण,रामप्रसाद देशमुख या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी भगवान राऊत यांनी बाईमाणूस या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म ची संकल्पना विशद केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अशोक कानडे, स्वाती ठुबे, सुनीलकुमार धस, बबनराव गिरी,ऋषिकेश राऊत,राजेंद्र पवार,शहाराम आगळे, आर.आर.माने, राजेंद्र फंड,प्रमोद येवले,किशोर डोंगरे, प्रशांत वाघ, शर्मिला रणधीर, राजेंद्र उदारे, दिशा गोसावी, निखिल गिरी, भाग्यश्री राऊत, जयश्री झरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दशरथ चौरे,मांगीलाल राठोड, बबन धुमाळ,दौंड, डॉ.अशोक ढगे,नेवासा, भानुदासआहेर,प्रा.डॉ.राजेंद्र थोरात,पुणे, उमेश घेवरीकर,शेवगांव, कु.श्रुती गालफाडे,लातूर, कु.अस्मिता मराठे, ज्ञानेश्वर जाधवर, बार्शी, सौ.माधुरी मरकड,पोपट वाबळे, बारामती, डॉ.शिवाजी काळे,श्रीरामपूर, प्रा.शशिकांत शिंदे,कोल्हार, डॉ.राजेश गायकवाड,सुनीता सावरकर, औरंगाबाद, डॉ.शुभांगी गादेगावकर,ठाणे,रघुराज मेटकरी,विटा यांना स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुस्तकं देउन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास अनेक साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होतें.