केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्धांच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवीदिल्ली दि.31 मे – राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात बौद्धांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली.त्यात मुंबईचे बौद्धधम्मगुरु भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो ; भदंत विरत्न थेरो यांसह बौद्ध भिक्खुंचा समावेश होता.
अनुसूचित जातीतून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या धर्मांतरित बौद्धांचा केंद्र सरकार च्या अनुसूचित जातींच्या यादीत समावेश करून धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींच्या सवलती द्याव्यात अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी बौद्धांच्या शिष्टमंडळातर्फे राष्ट्रपतींना निवेदन देऊन केली. येत्या काळात नवी दिल्लीत बौद्ध भंतें चे अधिवेशन आयोजित करण्यात येणार असून त्या अधिवेशनास राष्ट्रपतींनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण बौद्ध भिक्खुंतर्फे राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पर्यावरण आघाडी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयराजे ढमाल यांनी ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेऊन पर्यावरण बाबत अभ्यास आणि सद्यस्थितीतील समस्या आणि उपाय सुचविणारा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द केला.