न्यायालयीन

धनादेश न वटल्याने आरोपीस सहा महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीचे नुकसान भरपाईपोटी रुपये 1,50,000 एक महिन्याच्या आत देण्यात आले व रक्कम न झाल्यास अतिरिक्त चार महिन्यांचा कारावास!

अहमदनगर( प्रतिनिधी):-मे २०१८ मध्ये आरोपी सचिन बाबासाहेब नवधने राहणार नवधने स्वामील भवानी पेठ पुणे याने त्याच्या व्यवसाय करता रक्कम रुपये १,५०,००० ची हबीब शेख हुसेन राहणार बेलदार गल्ली अहमदनगर यांच्याकडून उसने वारे घेऊन आपसात ठरल्याप्रमाणे एक महिन्यात परत दिली नाही म्हणून सदर रकमेची मागणी केली असता आरोपीने रोख रक्कम न देता त्याचे खाते बँक खात्यावरील रक्कम रुपये १,००,००० चा चेक घेऊन तो निश्चित वाटण्याचे खात्री व भरोसा दिलेला असल्याने फिर्यादीने सदर चेक त्यांचे खाते असलेल्या बँकेत भरला असता. सदर चेक वाटण्या इतपत पुरेशी रक्कम आरोग्य खात्यात शिल्लक नसल्यामुळे सदर चेक ‘फंडस इन सफिशिएंट’ असा शेरा मारून न वाटला परत आल्याने त्याबाबत आरोपीस कळविले असता आरोपीने सदरचे पुन्हा तीन महिन्याने भरण्याची विनंती केली असल्याने सदर चेक फिर्यादीने दुसऱ्यांदा बँकेत भरला असता तो पुन्हा आरोपीची खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने नऊ वाजता परत आला असल्याने आरोपीस वकिलामार्फत नोटीस देण्यात आली. तरी आरोपीने फिर्यादी ती रक्कम परत दिली नसल्याने धीरे धीरे आरोपीविरुद्ध अहमदनगर येथील चिफ ज्युडी मॅजि साहेब अहमदनगर यांचे न्यायालयात एससीसी केस नं ५९०९/२०१८ दाखल केले असता सदर च्या केस मध्ये दोन्ही बाजूची लेखी व तोंडी पुरावा पाहून सदर आरोपी ने त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही. याची माहिती असताना देखील आदेश न वाटणारा चेक घेऊन फिरायची घोर फसवणूक केलेले आहे असे न्यायालयात प्रथम दर्शनी साबित झालेले असल्याने दि.२७/०५/२०२२ रोजी आति.मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब सूर्य श्री आर दंडे यांनी आरोपी दोषी धरून आरोपीस सहा महिने कारावासाची शिक्षा व फिर्यादीस नुकसानभरपाई पोटी रुपये १,५०,०००/- एक महिन्यात हात देण्याची शिक्षा सुनावल्या व नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीस अतिरिक्त चार महिन्यांचा कारावास सोसावा लागणार आहे. सदर प्रकरणांमध्ये फिर्यादी तर्फे ऍड सुबोध सुधाकर जाधव अहमदनगर यांनी काम पाहिले असून त्यांना ॲड शैलेंद्र राजाराम शिंदे ॲड सिद्धांत भाऊसाहेब शिंदे यांनी सहकार्य केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे