शहर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब भुजबळ झाले भाजपवासी !

अहमदनगर दि.२६ मे ( प्रतिनिधी):- अहमदनगर शहर काँग्रेसचे मा. अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला.बाळासाहेब भुजबळ हे काँग्रेसमध्ये नगर शहरातून ज्येष्ठ नेते मानले जात होते परंतु अंतर्गत कुरघोडी मुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.त्यांनी पक्षवाढीसाठी नगर शहरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात फिरून कार्यकर्ते एकत्र करून पक्ष वाढविण्यासाठी योगदान दिले,भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाने एक प्रकारे नगर शहर काँग्रेसला खिंडार पडल्या सारखेच आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक भय्या गंधे,जेष्ठ नेते अभय आगरकर,मा.स्थायी समिती सभापती किशोर डागवले,युवा नेते सुवेंद्र गांधी,नगरसेवक भैय्या परदेसी, माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र कुलकर्णी,भाजप मंडळ अध्यक्ष अजय चितळे,ज्ञानेश्वर काळे,बाबासाहेब सानप इत्यादी उपस्थित होते.