संयुक्त जयंती सोहळ्यातून समानतेचा संदेश : सुजीत झावरे
वासुंदे येथे संयुक्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात

पारनेर १७ मे ( प्रतिनिधी) :
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वासुंदे येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, यांचा भव्य संयुक्त जयंती महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील म्हणाले की आपल्याला सर्व महापुरुषांनी समतेची शिकवण दिली आहे. समाजामध्ये समानता टिकविण्यासाठी महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही महापुरुषाला आपण जातीच्या धर्माच्या चौकटीमध्ये अडकवणे हे चुकीचे आहे. संयुक्त जयंती उत्सव सोहळा साजरा केल्याने समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते. वासुंदे येथील बौद्ध बांधवांनी हा समानतेचा चांगला संदेश दिला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी अहमदनगर येथून प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रा. बाळासाहेब पवार हे उपस्थित होते तसेच युवा नेते अमोल साळवे, प्रा. विलास साठे, प्रा. देवानंद साठे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, वासुंदे गावचे प्रगतिशील शेतकरी भाऊ सैद, उपसरपंच शंकर बर्वे सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, रणजीत पाटील, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, माजी व्हा. चेअरमन बाळासाहेब झावरे, पोपटराव बर्वे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, शरद मेढे, प्रकाश मेढे, प्रा. एल. बी. जाधव, रिपाइंचे ज्येष्ठ नेते बन्सी घंगाळे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात, पुणेवाडी येथील युवा नेते पंकज सोनावणे, बाळासाहेब सोनावणे, किरण सोनावणे, कचरू सोनावणे, पुणेवाडी येथील श्रीनाथ शिक्षण संस्थेचे विश्वस्त तुषार सोनावणे, प्रसिद्ध नृत्यांगना रितु साठे, मनीषा साठे, प्रगती साठे, ऐश्वर्या साठे, सिंधू साठे, हिराबाई साठे, अलका साठे, राणी गायकवाड, प्रा. उज्वला साठे, उषा साठे, भारती साठे, सचिन साठे, रिपाइंचे तालुका उपाध्यक्ष राजेशभैय्या साठे, बहुजन समाज पार्टी जिल्हाउपाध्यक्ष जितेंद्रभैय्या साठे, पै अविनाश साठे, पै उत्तम साठे, अक्षय साठे, राहुल साठे, राहुल सु. साठे, विकी साठे, बाळासाहेब साठे, दीपक साठे, आकाश पटेकर, प्रमोद आरने, अक्षय आरने, प्रवीण खोडदे, बाळशिराम हिंगडे, अशोक साठे रमेश साठे दीपक य. साठे सत्यवान साठे अशोक भि. साठे, साहेबराव साठे, गणेश साठे, आदी वासुंदे येथील ग्रामस्थ तसेच बौद्ध समाजातील सर्व मान्यवर भीमज्योत तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****”
संयुक्त जयंती सोहळ्याचे प्रा. विलास साठे यांनी केले उत्तम नियोजन
वासुंदे गावचे आदर्श ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रा. विलास साठे सर यांनी वासुंदे येथे संयुक्त जयंती उत्सव सोहळा घेऊन एक सामाजिक चांगला संदेश दिला आहे. त्यांनी गावांमध्ये संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याचे उत्तम प्रकारे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे प्राध्यापक विलास साठे यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.