सामाजिक

वडगाव सावताळ येथे आधार कार्ड कॅम्प यशस्वी

३२५पेक्षा जास्त लोकांनी घेतला कॅम्पचा लाभ

पारनेर दि.१७ मे(प्रतिनिधी )
वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागांमध्ये यापुढील काळात शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, विधवा, परितक्त्या, दिव्यांग, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी, तरुण युवक, विद्यार्थी तसेच समाजातील शेवटच्या स्तरातील वंचित घटक यांच्यासाठी या पुढील काळात विविध केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत राबविणार असून सर्वसामान्य जनतेला या पुढील काळात नेहमी आधार देणार असल्याचे वडगाव सावताळ येथील जेष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
वडगाव सावताळ, गाजीपुर या आदिवासी भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा फायदा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन वडगाव सावताळचे ज्येष्ठ नेते मा. सरपंच भाऊसाहेब शिंदे हे ग्रामीण आदिवासी भागांमध्ये काम करत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर भाऊसाहेब शिंदे करत असलेले सामाजिक काम हे उल्लेखनीय आहे.
दरम्यान वडगाव सावताळ, गाजीपुर, याठिकाणी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून भारतीय डाक विभाग भारत सरकार व मा. भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागातील जनतेसाठी भव्य आधार कार्ड कॅम्प गुरुवार दिनांक १२ मे ते शनिवार दिनांक १४ मे या कालावधीमध्ये वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचा 325 पेक्षा जास्त आदिवासी तसेच मागासवर्गीय व मेंढपाळ समाजातील जनतेने या आधार कार्ड कॅम्पचा लाभ घेतला. या भव्य आधार कार्ड कॅम्पचे उद्घाटन पारनेर तालुक्यात युवा नेते दीपक लंके ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कॅम्प साठी विशेष सहकार्य सुधीर झाकीरे ,आधार वरीष्ट डाक अधिक्षक ,महाराष्टृराज्य, एस.रामकृष्णा वरिष्ठ डाक अधिक्षक अहमदनगर, सदिंप हादगल, सहाय्यक डाक अधिक्षक, सदिंप घोडके सहाय्यक डाक अधिक्षक, अहमदनगर, भारतीय डाक विभागाचे तसेच कर्मचारी देवंद्र शिंदे, बापु तांबे, दिंगबर शिंदे, योगेश आंबेकर, राजेंद्र ठुबे, महेश झावरे, वैभव मराठे, प्रकाश ताजवे, प्रभाकर राऊत, पिलन चैगुले, हे शिबिरात काम करत होते. तसेच वडगाव सावताळ येथील बाबासाहेब शिंदे (सरपंच), गोरख रोकडे गुरुजी (सोसायटी संचालक), सर्जेराव रोकडे (ग्रामपंचायत सदस्य), अनिल गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य), मंगेश रोकडे, संदीप निकम, अर्जुन रोकडे, योगेश शिंदे, रवी शिंदे, कुणाल शिंदे, भाऊ शिंदे, सुनील रोकडे गुरुजी, राजेंद्र बा. रोकडे, संदीप खंडाळे, सतिश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पवार, किरण सरोदे, तुकाराम जाधव, निवृत्ती शिंदे, संदिप रोकडे, सत्यवान शिंदे, राहुल शिंदे, हे शिबिर यशस्वी करणयासाठी मदत करीत होते. तसेच की.पा.रोकडे गुरुजी नामदेव रोकडे गुरुजी भाऊसाहेब रोकडे महाराज आदी वडगाव सावताळ येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

******

वडगाव सावताळचा जिल्ह्यात ठरला सर्वात मोठा आधार कार्ड कॅम्प

तालुक्यातील वडगाव सावताळ येथे भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने भव्य आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प चा लाभ समाजातील वंचित घटकातील लोकांनी घेतला या कॅम्प मध्ये 325 पेक्षा जास्त लोकांनी आपले आधार कार्ड नोंदवून घेतले. हा कॅम्प जिल्ह्यातील सर्वात मोठा आधार कार्ड कॅम्प ठरला असून भाऊसाहेब शिंदे मित्र मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे समाजात कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे