जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज आहे- आमदार संग्राम जगताप,वर्षभरा मध्ये येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला सिद्धीबाग येथील बुद्ध विहारामध्ये समाज बांधवांसाठी भोजनदान-मा.नगरसेवक अजय साळवे
बुध्द पौर्णिमे निमित्त सिद्धिबाग येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन!

अहमदनगर दि.१६ मे ( प्रतिनिधी):-आज वैशाखी पौर्णिमा म्हणजेच तथागत गौतम बुद्ध यांची जयंती,अहमदनगर शहरातील सिद्धीबाग येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास नगर शहराचे आ.संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या बाबी यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या यावेळी आमदार जगताप म्हणाले की जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांनी ध्यान साधना काय असते. हे जगाला दाखवून दिले आणि आपणही त्या तत्त्वावर चालले पाहिजे असे मत जगताप यांनी व्यक्त केले. भगवान गौतम बुद्धांनी हिंसेला थारा न देता अहिंसा या गोष्टीचे समर्थन करून जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून दिले.तसेच जगताप म्हणाले की बौद्ध धम्म हा विज्ञानवादी युगावर चालणारा आहे त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता व कोणताही मनात विचार न आणता या धम्माचे आचरण केले पाहीजे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.तसेच मा. नगरसेवक अजय साळवे यांनी येणाऱ्या वर्षभरातील पोर्णिमा सिद्धीबाग येथे साजरी करून समाज बांधव तसेच नागरीकांना भोजनदान या वर्षा पासुन सुरू करणार असल्याचे मत साळवे यांनी व्यक्त केले.
यावेळी सिद्धीबाग येथे शाहीर दादोबा साळवे,शाहीर शिंदे,गुलाब नेटके व व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुंदर असे गीते गायली.यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,सुशांत मस्के,मा.नगरसेवक अजय साळवे,प्रा.जयंत गायकवाड,पत्रकार महेश भोसले,इंजि.परिमल निकम, अभिजित खोसे,कौशल गायकवाड, नितीन कसबेकर, ससाणे मेजर इ. उपस्थित होते.