सामाजिक

अनेक आजारात होमिओपॅथी उपचार प्रभावी – आ रोहित पवार

कर्जत( प्रतिनिधी) : दि १६ मे
आरोग्यासारख्या प्रश्नावर आपण काम सुरू करून होमिओपॅथी उपचार सुरू करीत आहोत. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून समाजात या उपचाराने एक चांगला आधार निर्माण होईल असे प्रतिपादन आमदार रोहीत पवार यांनी केले. ते उपजिल्हा रुग्णालय आणि रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष विभागामार्फत होमिओपॅथी उपचार केंद्र सुरू करण्यात आले. त्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुंडलिक अवसरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालय आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम सुरू झाला. अनेक आजारात होमिओपॅथी उपचार हे प्रभावी असून याचा सर्व सामान्य माणसाला उपयोग होणार आहे. आरोग्य सुविधा अधिकाधिक चांगली करून सरकारी रुग्णालय हे एक अध्यवत सेवा पुरवतील असा मानस आहे. रोटरी क्लब ही एक सामाजिक भान जपणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे. आणि कर्जत रोटरी क्लबही अत्यंत तळमळीने सामाजिक काम करीत आहे.
यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, गटनेते संतोष मेहेत्रे, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, डॉ.मधुकर काळदाते, डॉ.चंद्रशेखर लांगोरे, डॉ.सुनील खामकर, डॉ.शबनम इनामदार यांच्यासह रोटरी क्लबचे प्रा विशाल मेहेत्रे, राजेंद्र सुपेकर, अनिल तोरडमल, नितीन देशमुख, अक्षय राऊत, अभय बोरा, सदाशिव फरांडे, संतोष सुरवसे, गणेश जेवरे, मुन्ना पठाण, काकासाहेब काकडे, संदीप गदादे, उत्तम मोहळकर, नामदेव गायकवाड, उपमन्यू शिंदे, राजेंद्र पठाडे यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे