जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालयमध्ये ठिय्या आंदोलन
निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत क्रॉसींग पट्टे व गतिरोधक बसवण्याचे प्रशासनाने दिले लेखी आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यलय येथे सदर रोडच्या विषया सदंर्भात निवेदन दिलेले होते. त्यानंतर आज तागायत गेल्या महिनाभरात नगर-जामखेड रोडवरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत परिसरात मोठे अपघात होत आहेत यात पोलिस प्रशासनाच्या नोंदीनुसार वेगवेगळ्या अपघातमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींनी केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे प्राण गमविलेले आहेत. झालेल्या अपघातामध्ये प्राण गमविलेल्या सर्वच्या सर्व व्यक्ती हया सामान्य किंवा मध्यम वर्गीय कुटूंबातील होत्या. परंतू या जागी जर कुणा नेत्याच्या परिवारातील व्यक्तींचा अपघाती मृत्यु झाला असता, निश्चित पणाने प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांनी गतिरोधकांची व्यवस्था केली असती. परंतु सामान्यांचा जीव कीड्या मुंग्याप्रमाणे समजणा-या प्रशासनाला पत्र देवून 2 महिने होऊन या दरम्यान 20 ते 25 निष्पाप व्यक्तींचा जीव जावून देखील जाग आलेली नाही.
असे अजून किती निष्पाप व्यक्तींनचे मृत्यु झाल्यानंतर प्रशासन जागे होईल. त्यामूळे संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करून लवकरात लवकर निंबुडी ते चिचोंडी पाटील आठवड गावापर्यंत क्रोसिंग पट्टे व गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथील उपविभागीय भियंता डी.एन. तारडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, दिपक गुगळे,अमित गांधी, विजय मिसाळ, सोहेल शेख, गौतमी भिंगारदिवे,वर्षा गांगर्डे, संदीप तेलधुणे सर आदी उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यलयाला टाळे ठोकले जाईल आणि त्यानंतर उद्भवणाया सर्व परिस्थितीस प्रशासन स्वता: जबाबदार राहील. अशी मागणी निवेदनाद्वारे जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.जन आधार या सामजिक संघटनेच्या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दाखल घेत निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत क्रॉसींग पट्टे व गतिरोधक बसवण्याचे प्रशासनाने दिले लेखी आदेश