सामाजिक सलोखा कायम राहावा – विशाल पाचारणे
केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने इफ्तार भोजनाचे आयोजन

अहमदनगर दि.३ मे (प्रतिनिधी)
ईस्लाम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यात अनेक जण रोजे धरतात . दोन वेळा हलका आहार घेऊन अल्लाहचे नामस्मरण व नमाज अदा करतात. मुस्लिम बांधव या सलग पूर्ण महिन्यात एकमेकांच्या घरी जाऊन उपवास सोडवतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात इफ्तार भोजनांचे आयोजन केले जाते. केडगाव जागरुक नागरिक मंचने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम टिकून राहावा यासाठी इफ्तार भोजनाचे आयोजन केले. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून एकमेकांची गळाभेट घेत व भोजनाचा आनंद व आस्वाद घेत उत्साहात इफ्तार साजरा करण्यात आला. केडगाव मस्जिद चे हाजि उस्मान गणी मन्यार व केडगावर प्रेस कलबचे अध्यक्ष समीर मन्यार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. व असे उपक्रम सर्व समाजांसाठी आदर्श निर्माण करणारे आहेत असे समाधान व्यक्त केले. मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले , प्रार्थनेनंतर भोजनाचे नियोजन झाले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुभाष बागले यांनी मांडले. प्रसंगी सद्दाम शेख ,अब्दुल खाकर शेख,समीर शेख,शफिक पठाण , तन्वीर शेख, जुबेर शेख, शाहरुख शेख,वाहिद बबु शेख , गुलाब पवार , समद अरब , यासीन अरब , मामु शेख , सलीम शेख , नसीर शेख , इक्बाल शेख , इलियास शेख शाकीर शेख , अयाज शेख , डॉ. समीर सय्यद ,अमीर सय्यद मुस्ताक पठाण, टिंग्या भालेकर गणेश पोळ, समीर मन्यार , अन्वर मन्यार , अमित मन्यार मंचचे प्रविण पाटसकर , ओमकार नवरखेले , अमोल शिरसाठ , मनिषा लहारे , शारदा शिरसाठ , अनिल मरकड मेघा पाटसकर आदि उपस्थित होते.