भिंगार शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर तरुणांनी कार्य करण्याची गरज - सागर चाबुकस्वार

भिंगार दि.२२ (प्रतिनिधी): महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. त्याच बरोबर दलित समाजासह सर्व समाजातील लोकांना उज्ज्वल भवितव्यासाठीचा मार्ग दाखवून दिला. तरुणांनी डॉ.आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालत चांगले कार्य केल्यास त्यांचं भवितव्य निश्चितच उज्वल असेल, असे प्रतिपादन भिंगार शहर काँग्रेसचे सागर चाबुकस्वार यांनी केले आहे.
भिंगार शहर काँग्रेस कमिटी व भिंगार येथील विविध सामाजिक तरुण मंडळांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल पासून अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन करत या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला. त्यानिमित्ताने जनकल्याण रक्तपेढीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यावेळी चाबुकस्वार बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, संतोष धिवर, अच्युत गाडे, श्रृजन भिंगारदिवे, निलेश शर्मा, विशाल शिंदे, प्रताप शिंदे, कैलास वाघस्कर, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रविण गीते, लखन छजलानी, क्रीडा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटोळे, मच्छिंद्र साळुंखे, सुरज गुंजाळ, अमित बडदे, आदित्य क्षीरसागर, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चाबुकस्वार म्हणाले की, विविध सामाजिक उपक्रम राबवून भिमजयंती या वर्षी भिंगारमध्ये तरुणांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. यातून सामाजिक भान जपत समाज उपयोगी उपक्रम तरुणांनी राबविले. आज समाजामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच चालण्याची गरज आहे. तरुणांनी आपले शिक्षण पूर्ण करत नोकरी तसेच स्वयंरोजगार या माध्यमातून स्वतःला सक्षम करण्याची गरज आहे. यावेळी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या तरुणांना भिंगार शहर काँग्रेसच्यावतीने मोफत पेन ड्राईव्हचे वाटप करण्यात आले.