ब्रेकिंग

कर्जत नगरपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १२ विकासाचे मॉडेल राहील : नामदेव राऊत यांची ग्वाही

कर्जत( प्रतिनिधी) : दि २२ एप्रिल
आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून आगामी काळात प्रभाग क्रमांक १२ हा कर्जत नगरपंचायतीमध्ये विकासाचे मॉडेल उभारण्याचा मानस आपला मानस आहे. यासाठी माझे कुटुंब-माझे झाड, महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटामार्फत लघुउद्योग सुरु करणे, सौर उर्जाचा वापर वाढवण्यासाठी घर तेथे सौर पॅनल यासह प्रभागात दुतर्फा झाडे लावणे व घरांचे कंपाउंड एकाच रंगात रंगविणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे प्रतिपादन विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले. ते “नगरपंचायत आपल्या दारी” या नवीन उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सर्व नगरसेवक-नगरसेविका आणि या नगरपंचायतीचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
“नगरपंचायत आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १२ चे विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत यांनी प्रथमता आपल्या प्रभागातून केला. सुरुवातीला नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक यांच्या हस्ते श्री दत्तमूर्ती व ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांनी विजेच्या खांबावरील लाईट, नादुरुस्त ड्रेनेज चेंबर, सफाई कर्मचारी यांच्याकडून होणारी अनियमित सफाई आदी समस्या मांडल्या. यासह प्रभागामध्ये नव्याने कॉक्रीटचे रस्ते, महत्वाच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक, शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र उभारणे, बंदिस्त गटार, शहाजीनगर व प्रभातनगर यांना जोडणारा पूल आ रोहित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची मागणी केली. शहाजीनगरमधील खुल्या जागेत सरंक्षक भिंत, लहान मुलांसाठी खेळणी व जेष्ठ नागरीकांसाठी बगीचा करण्याची मागणी करण्यात आली. उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी मोकळा सवांद घडवला. यावेळी राऊत यांनी उपस्थित केलेल्या सर्व अडचणी-समस्यांवर आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ काम करण्याची ग्वाही नामदेव राऊत यांनी यावेळी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत राऊत यांनी केले तर प्रा. रविंद्र जगदाळे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे