किरण चाबुकस्वार मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मिष्टान्न भोजन

अहमदनगर दि.१६ (प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र आंनदी वातावरणात साजरी करण्यात आली.नगर शहरात बऱ्याच मंडळांनी डिजे लावून मिरवणुका काढल्या माळीवाडा येथील किरण चाबुकस्वार मित्र मंडळाने जयंतीनिमित्त मिष्टान्न भोजनाचे वाटप करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. माळीवाडा येथे गेल्या ३० वर्षांपासून किरण चाबुकस्वार मित्र मंडळ अशा प्रकारे जयंती साजरी करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमप्रसंगी सिकंदर मामू, किरण चाबुकस्वार, जाकिर पठाण (वडाला), धर्मा चाबुकस्वार, प्रा.भीमराव पगारे, राजू शेख, नितीन कसबेकर, महेश भोसले, जितु शिरसाट, बंडू आव्हाड, करण चाबुकस्वार, अर्जुन चाबुकस्वार, रमेश साळवे, सुभाष सोनवणे, बाळासाहेब पवार, नेटके पाटील, पप्पू शेठ, पंडित सर तसेच माळीवाडा परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.