डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील बंद असलेल्या लाईट बाबत आरपीआय(आंबेडकर)कार्यकर्त्यांनी विचारला उपायुक्त पठारे यांना जाब!

अहमदनगर दि.७(प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना या महामारी नंतर जयंती साजरी होत आहे.त्यामुळे शहरातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.हे जरी खरे असले तरी शहरातील मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी प्रशासनासह शहरातील कार्यकर्ते येत असतात.त्या पुतळ्यासमोर असणारे लाईट गेल्या काही दिवसापासून बंद आहेत.ही बाब आरपीआय (आंबेडकर) गटाच्या कार्यकर्त्यांची लक्षात येताच कार्यकर्त्यांनी महानगरपालिका गाठत उपायुक्त पठारे यांना धारेवर धरत जाब विचारला.यावेळी
उपायुक्त पठारे यांनी तात्काळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देत बंद असलेल्या लाईट नवीन बसविल्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड शहराध्यक्ष संदीप वाघमारे नितीन कदम शिरीष विधाते जय कदम अविनाश वानखेडे अक्षय कदम निलेश जर्मन डी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.