केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

अहमदनगर दि.१९ (प्रतिनिधी) – कोपरगाव येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांनी सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कोल्हे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. समवेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार, भाजप नेते बिपिनदादा कोल्हे, मा आमदार स्नेहलता ताई कोल्हे, आर पी आयचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव साहेब, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, विभागीय जिल्हा प्रमुख भिमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव दीपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, अहमदनगर उत्तरेचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पुभाऊ बनसोडे, दक्षिणेचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, राहता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, नगर तालुका युवक सरचिटनिस निखिल सुर्यवंशी, कुंदन आरवडे, उत्तर महाराष्ट्र महिला ज्येष्ठ उपाध्यक्षा मंदाताई पारखे, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रमाताई धिवर, प्रदीप गायकवाड, मिलिंद धिवर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.