राजकिय
सभापती कुमार सिंह वाकळे यांनी जिल्हाभरातील रुग्णांना मोफत रक्त पिशवी देण्याचा घेतला निर्णय

अहमदनगर दि.१६ (प्रतिनिधी) : अहमदनगर महानगरपालिकाच्या 2022 -23च्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्प सभेत सभापती कुमार सिंह वाकळे यांनी जिल्हाभरातील रुग्णांना मोफत रक्त पिशवी देण्याचा निर्णय घेतला यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पिशवीच्या मोबदल्यात रक्तदान करण्याची अट ठेवण्यात आली आहे जर रुग्णांकडे रक्तदाता नसेल तर त्याला शंभर रुपये महापालिकेला भरावे लागणार आहे रक्ता पिशवी मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असते याच बरोबर आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे रक्त पिशवी खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागते यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले असून रुग्णाला आता मोफत रक्त पिशवी मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती कुमार सिंह वाकळे यांनी दिली.