सामाजिक

कलम १०१ च्या नावाखाली बेकायदेशीर कर्जवसुली करणाऱ्या वसुली अधिकाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार- दिपक कांबळे

सातारा :९ मार्च (प्रतिनिधी)
सद्या मार्च महिना चालू झाला आहे आणि बँका,पतसंस्था, पतपेढया यांची जोरदार कर्जवसुली चालू आहे.पण ही कर्जवसुली करताना काही मोजक्या बँका ,पतसंस्था सोडल्या तर सर्रासपणे बाकीच्या बँकांची अन्यायकारक आणि बेकायदेशीर कर्जवसुली चालू झाली आहे.जर ही अन्यायकारक आणि बेकायदेशीर कर्जवसुली त्वरित थांबली नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्जदार – जामीनदारांना घेऊन वसुली अधिकाऱ्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संघटना आणि कर्जदार – जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे मार्गदर्शक दिपक कांबळे यांनी दिला आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला आहे तसाच प्रत्येक कर्जदाराला सुद्धा सन्मानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे.कलम १०१ च्या नावाखाली बँकांच्या वसुली अधिकाऱ्यांची मनमानी कारभार चालू आहे.कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय एकतर्फी पगार कपात करणे,मालमत्ता जप्त करणे, कर्जदारांचे कोरे चेक घेऊन ते परस्पर रक्कम टाकून वटवणे.कर्जदारांना मानसिक त्रास देणे असे प्रकार सर्रासपणे वसुली अधिकारी करत आहे.या मानसिक त्रासाला कंटाळून काही कर्जदारांनी आत्महत्या केल्या आहेत,काही कर्जदारांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.काही सहकारी बँका व पतसंस्था सहकारी कलम १०१ खाली सहाय्यक निबंधकांना हाताशी धरून एकतर्फी वसुलीचा आदेश घेऊन कर्जदार, जामीनदारांना धाक ,धमकी,दपटशाहीचा वापर करून सावकारी पध्दतीने वेठीस धरतात ,हा अन्याय आहे.मुळातच सर्वसामान्य लोकांवर अन्याय झाला नाही पाहिजे,खाजगी सावकाराला आळा बसावा यासाठी सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली पण सहकार खातेच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी बरबटलेले आहे.त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण झाले आहे.कर्जवसुलीसाठी हे अधिकारी गाडी भरून कर्जदाराच्या घरी जातात तिथे सगळ्यासमोर त्या कर्जदाराच्या नावाने असा तमाशा करतात की जसे काय आता कर्जदार कर्ज बुडवून पळून निघाला आहे.काहीही कारण नसताना त्या कर्जदाराची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवतात,त्यांचे मानसिक खच्चीकरण करतात असे केल्याने वसुली अधिकाऱ्यांना आपले पीत्र स्वर्गात गेल्यासारखे वाटतात.यापुढे जर कोणत्याही कर्जदार व जामीनदार यांनी जर कर्जाच्या वसुलीच्या तगद्याने आत्महत्या केली तर संबंधित वसुली अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्या बँकेचा परवाना रद्द करावा अशीही मागणी दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री आणि रिझर्व्ह बँकेकडे केली आहे.तसेच या पुढे कोणत्याही वसुली अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर आणि गुंडाकरवी कर्जवसुली केली तर सगळ्या कर्जदारांच्या कुटुंबासहित त्या वसुली अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचेही संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे